रुग्णाच्या घराला केले नाही सॅनिटायझर...अखेर कटंगीकलावासींनी ग्रामपंचायत केली सील...वाचा सविस्तर

file photo
file photo
Updated on

गोंदिया : तालुक्‍यातील कटंगीकला येथील एका मृत कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबाला आयसोलेशन वॉर्डातून सुटी झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीकडे घराला सॅनिटायझर करण्याची मागणी केली. मात्र, ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. त्यामुळे गावकऱ्यांनी या कंटेन्मेट क्षेत्रातील असुविधेला घेऊन प्रशासनावर रोष व्यक्त केला. त्याचा निषेध म्हणून मंगळवारी (ता. २५) ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.

कटंगीकला येथे काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हे गाव कंटन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. कोरोनाबाधित एका व्यक्तीचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. सोमवारी (ता. २४) त्यांना आयसोलेशन वॉर्डातून सोडण्यात आले.

कुटुंबातील सदस्य घरी येताच त्यांना बंद असलेल्या घरात अस्वच्छता दिसली. त्यामुळे गावातील नागरिकांनी पीडित कुटुंबाचे घर सॅनिटायझर करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीला केली. यावर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अपशब्दांचा वापर करीत नागरिकांना हाकलून लावले.

ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

परिणामी, मृत व्यक्तीच्या कुटुंबाला सोमवारची रात्र अंगणातच काढावी लागली. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या कारभारावर रोष व्यक्त करीत नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, नायब तहसीलदार अनिल खडतकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

अधिकऱ्यांनी दिले आश्‍वासन…

यावेळी पंचायत समिती सदस्य अखिलेश शेठ व गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढा वाचला. तत्पश्‍चात अधिकाऱ्यांनी कंटेन्मेंट क्षेत्राची पाहणी करीत साफसफाई व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्‍वासन नागरिकांना दिले. या वेळी सरपंच प्रमिला डोंगरवार, उपसरपंच विनोद बिसेन उपस्थित होते.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com