
गौळ (जि. वर्धा) : भारतात सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. कोरोनामुळे सणांवर संक्रांत आल्याची पाहावयास मिळत आहे. संपूर्ण भारतात होळी सण फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुन पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस साजरा केला जातो. होळीत कोरोनाचा नायनाट होवो, असे साकडेच नागरिक घालताना दिसत आहे.
होळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि रंगांचा सण आहे. होळी या सणाला होळी पौर्णिमा व शिमगा असेही संबोधले जाते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळली जातात. पेटलेल्या होळी भोवती लोक प्रदक्षिणा घालतात. त्या होळीला नारळ अर्पण करून पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. अशापद्धतीने होळीचे पूजन केले जाते.
गावागावांमध्ये लोक एकत्र येऊन होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा करतात. या दिवशी लोक एकमेकांना गुलाल रंग लावून रंगांची उधळण करतात. विशेषतः तरुण वर्ग हा सण उत्साहाने साजरा करतात. सर्वांनी एकत्र येणे आणि आनंद साजरा करणे हा त्यामागचा उद्देश आहे. यावेळी शेतकरी वर्गाचा निवांत काळ असतो.
लहान मुले या सणाची आतुरतेने वाट बघतात. कारण रंग लावून रंगीबेरंगी होऊन मजा करायला सर्वांनाच आवडते. होळी सणातील विशेष म्हणजे अशुभ आणि अमंगल गोष्टी होळीच्या अग्नीत जाळून नाश करायचे आणि चांगल्या शुभ गोष्टींचा स्वीकार करायचा हा संदेश होळीचा सण देतो.
मात्र, काळानुरूप होळी हा सण मागे पडत चालला आहे ग्रामीण भागात लहान मोठे मुल घानमाकडीचा खेळ खेळून होळी सण येत असल्याचे संकेत द्यायचे. आज मात्र घानमाकड काळाच्या पडद्याआड गेल्याचे दिसत आहे. होळी पेटवताना शेणाने बनविलेल्या चाकोलींचा वापर माळ बनवून होळीत केला जातो. त्यासाठी पंधरादिवसांपूर्वीच तयारी व्हायची. आता मात्र मानापुरत्याच चाकोली तयार केल्या जाते. गतवर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाचे संकट कायम असल्याने होळीवर अनेक निर्बंध लादले गेले आहे. कोरोनामुळे सण-उत्सवावर विरजण पडत आहे. यंदाच्या होळीत कोरोना आजाराचा नायनाट व्हावा, असे साकडे नागरिक घालत आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.