esakal | धक्कादायक! कोरोना मृतदेहासोबत रुग्णांनी काढली अख्खी रात्र; नगर परिषद कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा

बोलून बातमी शोधा

death
धक्कादायक! कोरोना मृतदेहासोबत रुग्णांनी काढली अख्खी रात्र; नगर परिषद कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिमूर (जि. चंद्रपूर) : नगर परिषद क्षेत्रात असलेल्या कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालयात मृत पावलेल्या कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची आहे. उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी (ता. 19) रात्री अकरा वाजता एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. दरम्यान, याची माहिती रुग्णालयातर्फे नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली. मात्र, नगर परिषद प्रशासनाने सकाळपर्यंत मृतदेह उचलला नाही. त्यामुळे सर्व रुग्णांना मृतदेहासोबत रात्र काढावी लागली.

हेही वाचा: नागपूरकरांनो, लॉकडाउनच्या नियमावलीत मोठे बदल: वाचा काय राहणार सुरू आणि काय बंद

चिमूर तालुक्‍यात कोरोणा रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मृतांचीही संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रशासनावर कामाचा ताण वाढलेला आहे. कोविड केअर सेंटर तथा विलगीकरण केंद्रात असलेल्या रुग्णांपैकी ज्यांची ऑक्‍सिजनची पातळी घसरली. अशा रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात भरती केले जाते. गरजेप्रमाणे ऑक्‍सिजन दिले जाते. सोमवारला उपजिल्हा रुग्णालयात वीस रुग्ण भरती होते. त्यापैकी एकाचा अकरा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे मृत रुग्णाला अत्यंसंस्कारासाठी घेऊन जावे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने नगर परिषद प्रशासनाला दिली.

नगर परिषदेचे प्रशासकीय अधीक्षक राकेश चौगुले यांनी कोरोना रुग्णाला अंत्यसंस्कार करण्याकरिता नियुक्त टीममधील कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वणी केला. मात्र, अधीक्षक चौगुले यांच्या भ्रमणध्वनीस कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिलाच नाही. संबंधित कर्मचाऱ्यांच्या घरी बोलावण्याकरिता कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले. मात्र, कुणीही रात्री दार उघडले नाही.

हेही वाचा: नागपूर झाले नरकपूर! लोकप्रतिनिधींच्या केवळ घोषणाच; पालिका प्रशासन आणि महापौरांत समन्वयच नाही

अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे अधीक्षक हतबल झाले. ज्यामुळे या वॉर्डात असलेल्या इतर रुग्णांना मृत व्यक्तीसोबत रात्र काढावी लागली. या प्रकाराने रुग्णांचे नातेवाईक, नागरिकांत रोष निर्माण झाला. नगर परिषदेला नियमित मुख्याधिकारी नसल्याने कर्मचारी कुणालाही जुमानत नाही. अधीक्षकांकडे फक्त मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी दिली. मात्र, अधिकार दिले नसल्याने त्यांच्या आदेशाकडे फारसे कुणी गांभीर्याने घेत नाही.

संपादन - अथर्व महांकाळ