esakal | नागपूरकरांनो, लॉकडाउनच्या नियमावलीत मोठे बदल: वाचा काय राहणार सुरू आणि काय बंद

बोलून बातमी शोधा

lockdown
नागपूरकरांनो, लॉकडाउनच्या नियमावलीत मोठे बदल: वाचा काय राहणार सुरू आणि काय बंद
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नागपूर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत बाधितांची आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढतच चालली आहे. राज्याच्या उपराजधानीत तर मृत्यूतांडव सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र आता लॉकडाउनच्या नियमावलीत प्रशासनाकडून काही बदल करण्यात आले आहेत. त्यासंबंधीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: यवतमाळच्या खासगी हॉस्पिटलची देशभक्ती; पुलवामात तैनात असलेल्या सैनिकाच्या मातोश्रीवर मोफत उपचार

काय राहणार सुरु :

 • वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोर

 • वृत्तपत्र, मीडिया संदर्भातील सेवा

 • पेट्रोल पंप, गॅस एजन्सी

 • सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा

 • ऑटो (चालक + २ प्रवासी)

 • कार (चालक + २५० टक्के प्रवासी)

 • बस सेवा ( उभे राहून परवानगी नाही)

 • बँक आणि पोस्ट सेवा

 • बांधकाम आणि माल वाहतूक

 • अत्यावश्यक सेवेतील दुकानं आणि उद्योग

 • वकील आणि सी. ए. यांची कार्यालयं

सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेतील सेवा

 • किराणा दुकान

 • बेकरी, हातठेले

 • भाजीपाला विक्री,

 • चिकन-मटण आणि मांस विक्री

 • पशु खाद्य, शेती संबंधीची दुकानं

 • ऑप्टिकल्स दुकानं

 • निवासी हॉटेल ( किचन फक्त निवासी नागरिकांसाठीच)

हेही वाचा: लसीकरणानंतरही मृत्यू? ग्रामीण भागातील धक्कादायक प्रकार; प्रशासनाचे मात्र कानावर हात

हे संध्याकाळी ५.३० ते ७.३० सुरु

दूध आणि फळं विक्रीसाठी विशेष वेळ ठरवून देण्यात आली आहे. यानुसार दूध आणि फळं सकाळी ७ ते ११ या वेळेसोबतच संध्याकाळी ५.३० ते ७.३० या वेळेतही सुरु असणार आहे.

काय राहील बंद

 • शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था

 • धार्मिक सभा, राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम

 • धार्मिक स्थळं, धार्मिक कार्यक्रम

 • स्विमिंग पूल, क्रीडा कार्यक्रम

 • शहरातील सर्व आठवडीबाजार

 • हॉटेल, उपहारगृह यांची डायनिंग सेवा बंद (रात्री ११ पर्यंत होम डिलिव्हरी सुरु)

 • उद्यानं, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, मॉल्स, व्यायामशाळा, जिम्स

 • खासगी ऑफिस ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ