अख्खं गाव तापानं फणफणतंय, तरीही फक्त १०७ जणांची केली कोरोना चाचणी

corona testing
corona testinge sakal

सावली (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील मेहा बुज (meha buj village) हे अख्खे गाव तापाने फणफणत आहे. गावात ५०० हून अधिक लोक तापाने आहेत. समाजमाध्यमांवर (social media) याबाबतची माहिती व्हायरल झाल्यानंतर तालुका प्रशासनाने तेथे रविवारी तातडीने चाचणी शिबिर (corona testing camp) घेतले. यात एकूण १०७ जणांची चाचणी करण्यात आली असून १० जण पॉझिटिव्ह (corona positive) आढळून आले आहेत. (people suffer from fever in meha buj village of chandrapur)

corona testing
धोक्याची घंटा : मुलांसाठी ५ हजार खाटांची गरज; तिसऱ्या लाट थोपविणे गरजेचे

दीड हजार लोकसंख्या असलेल्या मेहा बूज येथे २ आठवड्यांपासून गावकरी तापाच्या साथीने हैराण झाले आहेत. तापाने गावातील आबाजी पेंदाम, हरबाजी कोलते, शेख रहीम कुरेशी यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्त व्हायरल झाले. त्याची दखल घेऊन पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी तालुका प्रशासन आणि आरोग्य विभागाला तातडीने विशेष शिबिर घेऊन आरोग्य तपासणी करण्याची सूचना केली. त्यानुसार रविवारी अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शिबिर आयोजित करून तपासणी करण्यात आली. यावेळी १०७ जणांची चाचणी करण्यात आली. त्यात १० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

नागपूर व विदर्भातील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा...

पॉझिटिव्ह रुग्णांवर सावली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाची दहशत असताना गावात तापाची साथ आली आहे. प्रत्येक घरामध्ये तापाचे रुग्ण आहेत. या सर्वांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले आहे. रविवारी झालेल्या शिबिरात तपासणी किट मोजक्‍याच होत्या. त्यामुळे किट उपलब्ध न झाल्याने अनेकांना परत जावे लागले. त्यामुळे आणखी शिबिर राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com