esakal | Video : चंद्रपूरकर म्हणतात, "हम नही सुधरेंगे'! तुम्ही करा दुरुस्ती, आम्ही याच पुलावरून जाणार...
sakal

बोलून बातमी शोधा

Podsa Bridge

पुलावरून वाहतूक बंद करण्यासाठी बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूंनी चक्क भिंत उभी केली होती. मात्र, जीवाची भीती नसलेले हे वाहनधारक उभी करण्यात आलेली भिंत भुईसपाट करीत होते.

Video : चंद्रपूरकर म्हणतात, "हम नही सुधरेंगे'! तुम्ही करा दुरुस्ती, आम्ही याच पुलावरून जाणार...

sakal_logo
By
नीलेश झाडे

धाबा (जि. चंद्रपूर) : महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा जिल्ह्यातील वर्धा नदीवरील जुना पोडसा पूल क्षतिग्रस्त झाला आहे. त्यामुळे शासनाने या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. पुलाची दुरुस्ती होत असल्याने पुलावरून वाहने नेण्यास बंदी घातली आहे. मात्र, दिलेला नियम पाळणे आमच्या रक्तातच नाही, यानुसार एकीकडे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना त्याच पुलावरून वाहनधारकांची ये-जा सुरूच आहे. 

महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडण्यासाठी पोडसा गावालगत वर्धा नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र, या पुलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात बंदी असलेल्या पदार्थांची तेलंगणातून तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या. पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आणि नदीला आलेल्या पहिल्याच पुरात पुलाने ढेप खाली. पुलाचा एक स्लॅब दबला गेला. अशा स्थितीतही पुलावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरूच होती.

अवश्य वाचा- दुकान लगाना है, तो हप्ता देना पडेगा...! 


पुलाच्या दोन्ही बाजूंनी केली भिंत उभी
पुलावरून वाहतूक बंद करण्यासाठी बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूंनी चक्क भिंत उभी केली होती. मात्र, जीवाची भीती नसलेले हे वाहनधारक उभी करण्यात आलेली भिंत भुईसपाट करीत होते. शेवटी शासनाने भिंतीच्या सुरक्षेसाठी तेथे चौकीदार तैनात करण्यात आला होता. पुलाच्या निर्मितीला साधारण 9 वर्षांचा काळ लोटला. आता पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुलावरून वाहने नेण्यास बंदी असल्याचे फलक बांधकाम विभागाने ठिकठिकाणी लावले आहेत. एकीकडे पुलाच्या दुरुस्तीचे कार्य सुरु असताना पुलावरून वाहनांची ये-जा सुरूच आहे. या पुलाच्या खाली नदीत मोठा डोह आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या प्रकाराकडे बांधकाम विभाग डोळे मिटून असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

loading image