तब्बल पाच हजार दिव्यांनी उजळणार परकोट; कुंभार बांधवांना मिळाले पणत्या निर्मितीचे काम

people will glow 5 thousands lamps on parkot
people will glow 5 thousands lamps on parkot

पवनी (जि. भंडारा) : आधुनिक संसाधनांमुळे पारंपरिक व्यवसाय अडचणीत आले आहेत. याच समस्येमुळे कुंभार बांधवांना मातीपासून तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यास अडचण येते. मात्र, पवनी येथील विद्यार्थ्यांनी कुंभार बांधवांना मदत करण्यासाठी दिपोत्सवाचे आयोजन केले असून किल्ल्याच्या परकोटावर पाच हजार दिवे लावण्यात येणार आहे. यामुळे कुंभारटोळीतील अनेक कुटुंबांच्या व्यवसायाला हातभार लागला आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवा तरुण पिढी कमी दराच्या फॅन्सी चायनीज व विद्युत दिवे वापरण्याकडे भर देत असताना, अचानकपणे जगावर कोरोना चे संकट येऊन ठाकले. त्यामुळे सर्व कारखाने, उद्योग व व्यवसाय बंद पडले होते. आधुनिकतेच्या व तंत्रज्ञानाच्या काळात मातीच्या दिव्याची वापरदेखील फार कमी प्रमाणात केला जातो आणि त्यातच पडलेला कोरोनाचा भर त्यामुळे कुंभार समाज विचित्र परिस्थितीत सापडला होता. 

दोन वेळची पोटाची खळगी कशी भागवायची असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. हे लक्षात येऊन परिसरातील विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनेतून स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचे ठरवून येत्या बुधवारी स्थानिक पवनराज परकोट किल्ल्यावर दिपोत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्यानिमित्त दिपोत्सवाला लागणारे दिवे परिसरातील कुंभार समाजाकडून बनवून घेण्याचे व त्यांना रोजगार देण्याचे या विद्यार्थ्यांनी ठरवले. 

बाजारात स्वस्त दरात इलेक्‍ट्रिक चायनीज दिवे उपलब्ध असतानासुद्धा जवळजवळ 5001 दिवे या परिसरातील कुंभाराकडून बनवून घेण्याचे काम दिले. कुंभार समाजातील व्यवसायिकांची कारागिरता, उत्तम वास्तुकला लक्षात घेता त्यांच्या व्यवसायांना अशाप्रकारे हातभार लावण्याचे परिसरातील नागरिकांना आवाहन देखील केले. विद्यार्थ्यांनी केलेली ही संकल्पना डोळ्यांसमोर येताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com