पतीच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी केला शारीरिक, मानसिक छळ आणि केली ही मागणी...

crime
crime

अमरावती : महिला छळाची मालिका थांबता थांबत नाही. कितीही कायदे झाले, कितीही गुन्हे दाखल झाले आणि समाज सुशिक्षित झाला तरीही महिला अत्याचाराच्या घटना घडतच आहेत, उलट त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथील विवाहितेने पतीच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी शारीरिक, मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर, तिच्याकडे कुटुंबातील काही पुरुषांनी शरीरसुखाची मागणी केली, असा गंभीर आरोपही तक्रारीत आहे.

आयुक्तालयातील नांदगावपेठ ठाण्यात दोन दीर, भासरे आणि त्यांना साथ देणारी सासू अशा चौघांविरुद्ध पोलिसांनी विनयभंग, मारहाण, कौटुंबिक कारणावरून शारीरिक, मानसिक छळ, जीवे मारण्याची धमकी इत्यादी गोष्टींसाठी गुन्हा दाखल केला आहे.

19 मे 2020 रोजी पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर ती 20 मे ते 8 जून या कालावधीत रुग्णालयामध्ये क्वारंटाइन होती. 8 जून रोजी रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर ती अहमदाबाद येथील आपल्या घरी गेली असता, एका दिराने तिला भावापेक्षा हिचा मृत्यू झाला असता तर बरे झाले असते, असे टोमणे मारले.

राहायचे असल्यास माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच दिर व भासऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तसेच शारीरिक, मानसिक छळ करून तिला अहमदाबाद येथील घराबाहेर हाकलून दिल्याचा आरोपही तिने नांदगावपेठ ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केला. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

ठळक बातमी - मी माय शरीर विकीन म्हणजे विकीन, जे होईल ते होईल जीवाचं, वाचा वारांगनाची व्यथा...

तपास केला जाईल
महिला असल्यामुळे या गुन्ह्यांचा तपास नांदगावपेठ पोलिसच करतील. ज्यांच्याविरुद्ध आरोप आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलविले जाईल.
गांगुर्डे, प्रभारी पोलिस निरीक्षक, नांदगावपेठ ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com