Video : चंद्रपूर जिल्ह्याच्या पोटात पेट्रोलचा साठा, काय आहे सत्य? 

file photo
file photo

धाबा (जि. चंद्रपूर) : गावात ठिकठिकाणी खड्डे खोदल्या गेले. गावात, गावाबाहेर पाइपलाइन पसरविल्या गेली. कोण? कुठून आलेत? काय करीत आहेत. गावाला याची कणभरही खबर नाही. उत्सुकतेपोटी गावकऱ्यांनी विचारले तेव्हा तुमच्या गावच्या जमिनीत पेट्रोल असल्याचे सांगण्यात आले. मग काय ...! गावकऱ्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. चर्चा पंचक्रोशीत पसरली. मात्र, नेमके कशाचे संशोधन केल्या गेले? संशोधन करणारे कोण होते? या प्रश्‍नाचे उत्तर गावकऱ्याकडे नाही. पळसगावात पेट्रोलच्या साठ्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू आहे. 

गावात चर्चेला उधाण 
ताडोबा, वीजनिर्मिती केंद्र आणि कोळसा खाणीमुळे चंद्रपूर जिल्ह्याची जगभर ओळख आहे. बल्लारपूर तालुक्‍यात येणाऱ्या पळसगावात पेट्रोल असल्याची चर्चा रंगली आहे.दोन ते तीन दिवसांपूर्वी पळसगावात काही हिंदी भाषिक आलेत. त्यांनी गावात आणि बाहेर एक फुटाचे खड्डे ठिकठिकाणी खोदलेत. त्यात पाइप लावले. ही पाइपलाइन गावभर पसरविल्या गेली. शासनाने एखाद्या संशोधनाचे कार्य हातात घेतले असावे, त्याचे सर्वेक्षण सुरू असावे, अशी शंका गावकऱ्यांना आली.

उत्सुकतेपोटी काही गावकऱ्यांनी पाइपलाइन टाकणाऱ्या मजुरांना काय प्रकार असल्याची विचारणा केली. तेव्हा तुम्हचा जमिनीत पेट्रोल असल्याचे मजुरांनी गावकऱ्यांना सांगितले. मग काय? बघता बघता चर्चा पंचक्रोशीत पसरली. आपल्या गावात पेट्रोल निघणार यांचा आनंद गावकऱ्यांत दिसून आला. 

दोन दिवसांत पाइप काढले
पेट्रोलचा शोध घेण्यासाठी पाइप पसरविल्याचे मजुरांनी गावकऱ्यांना सांगितले होते. दोन दिवस ही पाइपलाइन गावात उभी होती. सोमवारला दहा वाजतापर्यंत गावात पसरविलेले पाइप काढण्यात आले. 

सर्वे करणारे कोण? ग्रामपंचायतीला माहिती नाही 
याबाबत पळसगाव ग्रामपंचायतेचे सचिव आणि सरपंचाशी संपर्क साधला असता त्यांनाही सर्वे कुणाचा? याची माहिती नसल्याचे सांगितले. गावात आणि गावाबाहेर ठिकठिकाणी पाइप पसरविल्या गेले. मात्र, याबाबत ग्रामपंचायतीची कुठलीच परवानगी घेण्यात आली नाही.

क्लिक करा - आला 'हंडी'चा महिना... बहिरम यात्रेचा शंखनाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com