esakal | 'आधी पावसानं सोयाबीन सडलंय, आता कापसावर बोंडअळी; आम्ही जगायचं तरी कसं?'
sakal

बोलून बातमी शोधा

Pink bollworm on cotton in yavatmal

आर्णी तालुक्‍यातील लोणी-जवळा सर्कलमध्ये परतीच्या पावसाचा पिकांना चांगलाच फटका बसला आहे. कपाशीवर बोंडअळी आली. बोंडेही झाडालाच सडत आहे. एकरी क्विंटल कापूस निघण्याची शक्‍यता मावळली आहे. सोयाबीनचीही हीच अवस्था आहे. शेतकऱ्यांनी एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च केला.

'आधी पावसानं सोयाबीन सडलंय, आता कापसावर बोंडअळी; आम्ही जगायचं तरी कसं?'

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशीचे बोंडे सडत असून, गुलाबी बोंडअळीचे दुहेरी संकट ओढवले आहे. तर, सोयाबीनचे पीकही सडत आहे. घरात काहीच उत्पन्न येण्याची चिन्हे नाहीत. हेक्‍टरी सरसकट 40 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी (ता.21) आर्णी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली.

हेही वाचा - ग्रेट! आठवीच्या विद्यार्थ्याने बनविले धान्यसफाईचे यंत्र; इनोव्हेशन अवॉर्डसाठी झाली...

आर्णी तालुक्‍यातील लोणी-जवळा सर्कलमध्ये परतीच्या पावसाचा पिकांना चांगलाच फटका बसला आहे. कपाशीवर बोंडअळी आली. बोंडेही झाडालाच सडत आहे. एकरी क्विंटल कापूस निघण्याची शक्‍यता मावळली आहे. सोयाबीनचीही हीच अवस्था आहे. शेतकऱ्यांनी एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च केला. मात्र, दोन हजार रुपयांचे उत्पन्न हाती येणार नाही. पिकांचे अतोनात नुकसान झाले तरी प्रशासनातील अधिकारी व नेत्यांनी बांधावर येऊन पाहणी केली नाही. जगावे की मरावे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बोंडे व सोयाबीन घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. पंचनामा न करता थेट मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी इंद्रपाल चौधरी, पद्माकर होले,विशाल मुंदे, संतोष राऊत, अनिल जाधव, अशोक जोगदंड, अनिल बोढे, पवन सोनोने, अमोल वारंगे, विष्णू होळकर, निखिल खारोळ, प्रफुल्ल पाचवारे, गुणवंत यादव, निखिल लाड, प्रकाश रामटेके यांच्यासह लोणी व जवळा येथील शेतकरी उपस्थित होते.

loading image