
अमरावती : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना कमी व विमा कंपनीला अधिक नफा झाला आहे. गतवर्षीच्या (२०२४) हंगामात विमा कंपनीने तब्बल ६७.८० कोटी रुपये नफा मिळवला तर शेतकऱ्यांच्या हिस्स्यावर ५०.६१ कोटी आले. सुधारित विमा योजनेतही शेतकऱ्यांना परतावा अधिक मिळण्याची शक्यता कमीच आहे.