किटविनाच कीटकनाशकांची फवारणी; विषबाधेचा फास यंदाही कायम

किटविनाच कीटकनाशकांची फवारणी; विषबाधेचा फास यंदाही कायम

यवतमाळ : शेतातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढू लागताच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कीटकनाशक फवारणीला सुरुवात केली आहे. शेतकरी, शेतमजूर सुरक्षा किटविनाच फवारणी करीत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. महागाव तालुक्यात एक मृत्यू झाला, तर सात बाधितांना आतापर्यंत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फवारणी करताना मिश्र कीटकनाशक रसायनांचा वापर धोकादायक ठरू शकतो. असे असतानाही जनजागृतीअभावी शेतकरी, शेतमजूर बिनधास्तपणे फवारणी करतात. कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी न घेतल्याने शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. तीन वर्षांपूर्वी विषबाधेने शेतकरी, शेतमजुरांच्या मृत्यूने जिल्हा चांगलाच हादरला होता. कीटनाशक फवारणीचे विदारक वास्तवही पुढे आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी कशाप्रकारे फवारणी करावी, याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात आले. मात्र, शेतकरी, शेतमजुरापर्यंत सुविधा पोहोचविण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.

किटविनाच कीटकनाशकांची फवारणी; विषबाधेचा फास यंदाही कायम
दोन दिवसांपासून सोयाबीनचे भाव होत आहेत कमी, आता क्विंटलमागे इतका दर

कपाशी, सोयाबीन पिकांवर किडीचे आक्रमण वाढल्याने शेतकऱ्यांचा कल फवारणीकडे वाढला आहे. ग्रामीण भागात एकाच व्यक्तीच्या खांद्यावर फवारणीचा भार येत आहे. त्यातही सुरक्षेसाठी त्याला कोणत्याही प्रकारची उपकरणे पुरविली जात नाहीत. त्यामुळे खरीप हंगामातील फवारणी शेतकऱ्यांच्या जिवावर बेतत आहे.

आता प्रशासनाने योग्य ती खबरदारी न घेतल्यास फवारणी विषबाधेचे संकट अधिक गंभीर रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत आहे. जुलैपासून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विषबाधा झालेल्या सात जणांवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले. मात्र, वणी, मारेगाव, राळेगाव, महागाव, उमरखेड, पुसद आदी तालुक्यातील बहुतांश विषबाधितांनी उपचारासाठी परजिल्ह्यात धाव घेतल्याची माहिती आहे.

किटविनाच कीटकनाशकांची फवारणी; विषबाधेचा फास यंदाही कायम
मराठीच्या ‘अभिजात’ दर्जासाठी खासदार धोत्रे यांचे केंद्राला साकडे

हे विसरू नका

  • फवारणीचे पंप गळत असल्यास वापरू नका

  • फवारणी करताना वापरलेले कपडे घरी आल्यावर स्वच्छ धुवा व आंघोळ करा

  • फवारणी करताना गॉगल, चष्मा, हातमोजे, मास्क, टोपी, अ‍ॅप्रन किंवा पूर्ण बाह्याचे शर्ट, पॅन्ट व बूट घाला

  • फवारणी सकाळच्या किंवा सायंकाळच्या सुमारास करा

  • दुपारी किंवा प्रखर उन्हात, हवा वाहत असल्यास किंवा ढगाळ वातावरणात फवारणी करणे टाळा

फवारणी करताना शेतकरी सुरक्षाकिटचा वापर करीत नसल्याने विषबाधा होत आहेत. आतापर्यंत सात जण बाधित झाले असून, यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात एकही मृत्यू झालेला नाही.
- डॉ. बाबा येलके, औषधशास्त्र विभागप्रमुख, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com