ऐतिहासिक शेंदूरजनाघाटच्या पोळ्याबाबत आला हा मोठा निर्णय, वाचा काय ते... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pola Bazaar at Shendoorjanaghat canceled due to corona

शेंदूरजनाघाट येथील पोळाबाजार प्रसिद्ध आहे. या पोळाबाजारात अवघ्या दोन-तीन दिवसांत कोट्यवधींची उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाच्या महामारीमळे हा बाजार रद्द करण्यात आला आहे. शेंदूरजनाघाट येथील पोळाबाजारात मोठी उलाढाल ही फर्निचर बाजारात होत असते.

ऐतिहासिक शेंदूरजनाघाटच्या पोळ्याबाबत आला हा मोठा निर्णय, वाचा काय ते...

शेंदूरजनाघाट (जि. अमरावती) : पोळ्याचा सण शेतकऱ्याच्या जीवनात सर्वात महत्त्वाचा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. ग्रामीण भागात मोठा तर शहरी भागात पोळ्याची धूम असते. यंदा कोरोनामुळे सण समारंभांवर पाणी सोडावे लागत असून, पोळ्याच्या आनंदावरही विरजण पडणार आहे. ग्रामीण भागात यंदा पोळ्याचा उत्सव राहणार नसून मोठमोठे पोळे भरणार नाहीत. पंचक्रोशीत मोठया असलेल्या या पोळ्याबाबत अशीच घोषणा करण्यात आली.

शेंदूरजनाघाट येथील पोळाबाजार प्रसिद्ध आहे. या पोळाबाजारात अवघ्या दोन-तीन दिवसांत कोट्यवधींची उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाच्या महामारीमळे हा बाजार रद्द करण्यात आला आहे. शेंदूरजनाघाट येथील पोळाबाजारात मोठी उलाढाल ही फर्निचर बाजारात होत असते. सोफा, दिवाण, कपाट, टेबल, खुर्च्या या लाकडी त्याचप्रमाणे फायबर वस्तूंची रेलचेल असते.

अधिक माहितीसाठी - तिला माहीत होतं आपण मरणार; तरी नियतीला शरण न जाता मिळवले 75 टक्के; मात्र, कौतुक ऐकण्यासाठी ती आज नाही...
 

शेतीपयोगी वस्तू कु-हाड, विळी, डवरे, वखर यांच्या पासा त्याचप्रमाणे कुपरण, सब्बल, खुरपी आदी अनेक वस्तू शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तसेच गृहपयोगी लागणा-या तव्यापासून सर्वच वस्तू या बाजारात सहज उपलब्ध होतात. लहान मुलांच्या खेळण्यापासून सौंदर्य प्रसाधने तसेच इतर गोष्टी सहज मिळतात.

पोळ्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे खांदमर्दनच्या दिवशी २४ तास या बाजारात एकच गर्दी राहते. अक्षरश: रात्री दोनपर्यंत हा बाजार सुरू असतो. या बाजारासाठी अमरावती, नागपूर, वर्धा त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातून दुकानदार आपला माल विक्रीसाठी आणतात. या वर्षी संत्रा कलमांना चांगला भाव मिळाल्याने खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली असती,

नगरपरिषदेने काढली  नोटीस

परंतु दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच शेंदूरजनाघाट येथे ३१ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यामुळे नगरपरिषदेने यावर्षी पोळा बाजार भरणार नसल्याची नोटीस काढली आहे. वर्षानुवर्षांची परंपरा असलेला पोळाबाजार यावर्षी भरणार नसल्यामुळे कारागिरांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली असून बाजारातून विशेष खरेदी करण्याची संधी यावर्षी मिळणार नाही. 

संपादन : अतुल मांगे