

Farmer Bull Bond in Maharashtra Pola Festival Highlights Tradition of Naming Bulls and Their Emotional Connection With Farmers
sakal
-आरती दलाल-धारकर
नागपूर: शेताच्या बांधातून जेव्हा बैलाला हाक मारली जाते तेव्हा त्याचे कान टवकारतात आणि तो कामासाठी सज्ज होतो. आपल्याकडे बैलाचे नाव ठेवण्याची पद्धत आहे. तो कधी ढवळ्या असतो, कधी पवळ्या असतो, तर कधी चितळ्या असतो. अनेकदा त्याचे नाव रंगरुपावरून, तर कधी गुणांवरून ठेवतात. नावाने दिलेली हाक त्याच्याप्रती शेतकऱ्याची संवेदना व्यक्त करते.