"तो' तिला वरमाला घालायला आला, पडल्या मात्र बेड्या... 

संतोष तापकिरे
Tuesday, 28 July 2020

लग्न हा दोघांच्याही आयुष्याचा प्रश्‍न असतो. त्यासाठी सहमती महत्त्वाची असते. अन्यथा लग्नासाठी किंवा एखाद्या युवतीचे प्रेम प्राप्त करण्यासाठी बळाचा वापर करणे अनेकदा घातकसुद्धा ठरते. शुभमच्या बाबतीतसुद्धा नेमके असेच काहीसे झाले.

अमरावती : त्याची तिच्यासोबत लग्न करण्याची जरा जास्तच इच्छा होती. परंतु ती त्याच्या गळ्यात वरमाला घालण्यासाठी तयार नव्हती. तो तिच्या घरी आला अन्‌ म्हणाला, ""म्हणालो होतो नं, एक दिवस लग्नासाठी पळवून नेईल म्हणून,'' याची आठवण त्याने तिला करून दिली. 
वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. पोलिसांनी संशयित शुभम राजेश खाकरे (वय 26, रा. मोठी उमरी, जि. अकोला) याला अपहरण, विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. 

लग्न हा दोघांच्याही आयुष्याचा प्रश्‍न असतो. त्यासाठी सहमती महत्त्वाची असते. अन्यथा लग्नासाठी किंवा एखाद्या युवतीचे प्रेम प्राप्त करण्यासाठी बळाचा वापर करणे अनेकदा घातकसुद्धा ठरते. शुभमच्या बाबतीतसुद्धा नेमके असेच काहीसे झाले. वलगाव हद्दीत राहणाऱ्या 18 वर्षीय युवतीच्या भेटीसाठी शुभम बरेचदा तिच्या गावी येत होता. फोनवरून तिच्यासोबत संभाषणही करायचा. संभाषण करता करता ती आपलीच होईल या विश्‍वासाने शुभमने तिच्या इच्छेचा विचार न करता थेट लग्नाची मागणी केली. तिने मात्र पहिल्याच मागणीत त्याला लग्नासाठी नकार दिला होता. परंतु शुभम काही केल्या माघार घ्यायला तयार नव्हता. 

अवश्य वाचा- वो मेरी है! उससे शादी करेगा तो ऍसिड फेक दुंगा... दिली त्याने धमकी 

त्याने पुन्हा पुन्हा तिच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधणे सुरूच ठेवले. तुला जबरदस्तीने लग्न करण्यासाठी पळवून घेऊन जाईल, याची आठवण शुभमने तिला करून दिली आणि तो रविवारी (ता. 26) दुपारीच तिच्या घरी पोहोचला. बळजबरीने तिला पकडले. चाकूचा धाक दाखवून दुचाकीवर बसण्यास सांगितले. घाबरलेली युवती भीतीमुळे त्याच्या दुचाकीवर बसली. अपहरण करून घेऊन जात असताना तिने आरडाओरड केली. आजूबाजूचे लोकं जमा झाले. त्यामुळे तो तिला सोडून अर्ध्या वाटेतून निघून गेला. परंतु जाताना त्याने पुन्हा तिला जुनीच धमकी दिली, ""तुला एक दिवस लग्नासाठीच पळवून नेईलच.'' अखेर युवतीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शुभमला अटक केली. 

अवश्य वाचा- तळेगावच्या रॅंचोने टाकावू वस्तूंपासून बनविला एसी.... पीपीई कीटसाठी उपयुक्त

 

एकतर्फी प्रेमातून शुभमने संबंधित युवतीला त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर तिच्या तक्रारीवरून त्याला अटक केली आहे. 
- आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक वलगाव ठाणे. 

संपादन - राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested a man in Kidnapping a young girl. He was interested to marry her