
चार लाख दोन हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. घटनास्थळवरून चार आरोपी फरार झाले असून, एकूण २० आरोपींवर तिवसा पोलिसांनी जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहे.
तिवसा (जि. अमरावती) : पडिक असलेल्या शेतशिवारात तिवसा पोलिसांनी धाड टाकून १६ आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून चार लाख दोन हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २६ जानेवारीला दुपारी कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवसा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गुरुकुंज मोझरी येथील दासटेकडीच्या मागील बाजूला एका शेतशिवारात जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती तिवसा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दुपारी १२ वाजतापासून तिवसा पोलिसांचे पथक जुगार खेळणाऱ्या परिसरात सापळा रचून होते.
दुपारी पाच वाजता अतिशय शिताफीने जुगारस्थळी रेस्क्यू करीत जुगारावर धाड टाकली व घटनास्थलावरून एकूण १६ आरोपींसह १० मोटर सायकल, मोबाईल व नगदी असा एकूण चार लाख दोन हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. घटनास्थळवरून चार आरोपी फरार झाले असून, एकूण २० आरोपींवर तिवसा पोलिसांनी जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहे.
जाणून घ्या - VIDEO : '...तर काँग्रेस अन् राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरुंगात जातील'
आरोपींमध्ये तिवसा, माहुली जहागीर, मोझरी येथील जुगाऱ्यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शैलेश मस्के, नापोका अरविंद गावंडे, पोकॉ मंगेश साव, विशाल करूले, भूषण चंदेल, भूषण नंदरधने, राजेंद्र चव्हाण यांनी केली आहे.