पोलिसांनी केला त्याचा धूम स्टाईल पाठलाग! अखेर जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

वरठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. 19 जून रोजी त्याने सिरसी परिसरात मोटरसायकल चोरीचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या दिवशी सातोना येथे फुलचंद हटवार यांची दुचाकी चोरली. पोलिसांनी चोरीचा तपास सुरू केला असता, त्यांना अजय कनोजे याचा सुगावा लागला. तो वरठीमध्येच वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

वरठी(जि. भंडारा) : बेमालूमपणे चोरी करून पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार होणारा चोर आपण "धूम" चित्रपटातून बघितला आहे. असाच काहीसा प्रत्यय वरठी पोलिसांना आला. आपल्या मागावर पोलिस असल्याचे कळताच अजय कनोजे नामक दुचाकीचोर मोटारसायकलने धूम पळाला; पण पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून बेड्या ठोकल्या. एखाद्या चित्रपटात शोभावा असा प्रसंग वरठीत घडला.

अजय कनोजे असे आरोपीचे नाव असून तो मूळचा बिरसी(ता. तिरोडा) येथील रहिवासी आहे.
अजय हा एक अट्टल व सराईत मोटारसायकल चोर आहे. तो गत काही दिवसांपासून वरठी येथील शास्त्री वॉर्डात लपून राहात होता. वरठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. 19 जून रोजी त्याने सिरसी परिसरात मोटरसायकल चोरीचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या दिवशी सातोना येथे फुलचंद हटवार यांची दुचाकी चोरली. पोलिसांनी चोरीचा तपास सुरू केला असता, त्यांना अजय कनोजे याचा सुगावा लागला. तो वरठीमध्येच वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सविस्तर वाचा - गुन्हे शाखेमुळे गॅंगवार टळला, हे आहे कारण...

त्यामुळे पोलिस त्याच्या पाळतीवरच होते. त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्याला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला. दरम्यान कुणकूण लागताच त्याने दुचाकीसह धूम ठोकली. दरम्यान पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करीत अखेर त्याला जेरबंद केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेश थोरात यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुबोध वंजारी, हवालदार संदीप बांते, त्रिमूर्ती लांडगे, आकांत रायपूरकर, नितीन भालाधरे, प्रतीक उके व गुलाब भोंडे यांनी केली. यापूर्वी अजय कनोजे याच्याविरोधात वरठी ठाण्यात मागच्यावर्षी देशी पिस्तूल बाळगणे व घरफोडीच्या प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police caught theif