वर्धा : महात्मा गांधी यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात पोलिसांनी अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात मोहीम राबवली आहे..यादरम्यान जिल्ह्यातील विविध भागांमध्ये दोन कोटी ९३ लाख रुपयांचा दारूसाठा आणि मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली..पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ६२६ अंमलदार, १९ ठाणेदार आणि चार उपविभागीय अधिकारी यांनी एकाच वेळी जिल्ह्यातील १९ ठिकाणी कारवाई केली. यात १७३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १८८ आरोपींना अटक करण्यात आली आहे..Fake Call Center Scam: अमेरिकन नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणारा फारुकी अखेर जेरबंद; ६० लाखांचा मुद्देमाल जप्त.यावेळी पोलिसांनी ई-साक्ष अॅपच्या माध्यमातून पुरावे नोंदविल्याचेही सांगण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू उत्पादन आणि विक्री गांधीभूमीत कशी सुरू राहिली, याविषयी उलटसुटल चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या मोहिमेचा उद्देश निवडणूकपूर्व स्वच्छता मोहीम आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.