अखेर बडनेराच्या त्या विकृत लॅब टेक्‍निशियनची कारागृहात रवानगी

सुरेंद्र चापोरकर
Friday, 31 July 2020

अलकेश अशोक देशमुख (वय 28, रा. पुसद) विरुद्ध मंगळवारी (ता. 28 ) गुन्हा दाखल झाला. त्याला रात्रीच पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (ता. 31) बडनेरा पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या घटनेचे संतप्त पडसाद गुरुवारी (ता. 30) शहरात उमटले.

अमरावती : बडनेरा येथील पीडितेचे प्रकरण चांगलेच चिघळले असून कोरोना चाचणीच्या नावावर 24 वर्षीय युवतीच्या गुप्तांगाचा स्लॅब घेणाऱ्या लॅब टेक्‍निशियनला जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी (ता. 31) न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची कारागृहात रवानगी झाली.

अलकेश अशोक देशमुख (वय 28, रा. पुसद) विरुद्ध मंगळवारी (ता. 28 ) गुन्हा दाखल झाला. त्याला रात्रीच पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (ता. 31) बडनेरा पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या घटनेचे संतप्त पडसाद गुरुवारी (ता. 30) शहरात उमटले.

बडनेराच्या मोदी रुग्णालयात राजकीय पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. रुग्णालयात तोडफोड केली. लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला जाब विचारून आपला रोष व्यक्त केला.

लॅब टेक्‍निशियनच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तपास अधिकाऱ्यांनी त्याला आज पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. त्याला न्यायालयीन कोठडीत सुनावल्यामुळे पोलिसांनी त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली. या घटनेनंतर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी गाडगेनगर पोलिसांनी लॅब टेक्‍निशियनला न्यायालयात नेत असतानापासून तर, कारागृहात पोहोचवून देण्यापर्यंत बंदोबस्त दिला.
अलकेश देशमुखने पीडित युवतीची कोरोनाच्या नावाने दुसरीच चाचणी घेतल्यावर तिला, तू खूपच सुंदर दिसते, मैत्री करते का? असा मॅसेज पाठविला होता. पीडित युवतीने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून या घटनेचे गांभीर्य सर्वांपुढे आले.

सविस्तर वाचा - बडनेऱ्यातील लाजीरवाण्या घटनेसंदर्भात संतापाची लाट, त्या पीडितेसाठी खासदार नवनीत राणा उतरणार रस्त्यावर!

तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल
महिलेची वेगळीच चाचणी घेणाऱ्याविरुद्ध रोष व्यक्त करताना, एआयएमआयएमसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बडनेराच्या मोदी रुग्णालयात गुरुवारी (ता.30) तोडफोड केली होती. त्याप्रकरणी जवळपास ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे पोलिस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी सांगितले.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police custody to lab technician