Amravati News : अजित पवार यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न,पोलिसांनी नऊ जणांना केले स्थानबद्ध

Amravati News : रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली.
Ajit Pawar ,Amravati News
Ajit pawarsakal
Updated on

अमरावती : रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अमरावतीत काळे झेंडे दाखविण्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांना पोलिसांनी आज स्थानबद्ध केले.

रामगिरी महाराज यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत हे विधान केल्याने या दोघांचाही निषेध करीत असल्याचे वाक्य आंदोलकांकडून पोलिसांनी जप्त केलेल्या बॅनरवर दिसून आले. स्थानबद्ध करून या पदाधिकाऱ्यांना नागपुरीगेट ठाण्यात ठेवण्यात आले होते.

ऑल इंडिया कौमी तंझीम व काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांचा या आंदोलनात सहभाग होता. मोहंमद अकील, अब्दुल हनिफ अब्दुल मुनाफ, सय्यद नौशाद सय्यद बाबर, अ. करीम अ. रहीम, मोहंमद आरीफ शेख मेहबुब, शेख अन्सार शेख शेख युनूस, अब्दुल रफिक अ. रज्जाक उर्फ रफ्फूसह अन्य दोघे यांचा त्यात समावेश असल्याचे नागपुरीगेटचे पोलिस निरीक्षक हनमंत उरलागोंडावार यांनी सांगितले.

गुरुवारी (ता. २६) सकाळी साडेदहाच्या सुमारास रहमतनगर परिसरातुन निषेधाचे बॅनर घेऊन निघताच या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. उपमुख्यमंत्री अमरावती येथून रवाना झाल्यानंतर स्थानबद्ध केलेल्या लोकांची सुटका करण्यात आली. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com