esakal | यवतमाळ जिल्ह्यातील वाईत कोंबड बाजारावर छापा; दुचाकी वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

police raid on hens fight in Yavatmal district

वाई (हातोला) शिवारात भरणाऱ्या कोंबडबाजारावर लाखोंची उलाढाल होते. मंगळवार, शुक्रवार व रविवार, अशी तीन दिवस येथे जत्रा भरते. लॉकडाउन कालावधीत सर्वकाही बंद असताना कोंबडबाजार बंद करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे तत्कालीन ठाणेदारांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. 

यवतमाळ जिल्ह्यातील वाईत कोंबड बाजारावर छापा; दुचाकी वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
राजकुमार भितकर

यवतमाळ : मागील अनेक महिन्यांपासून बिनदिक्कत सुरू असलेल्या वाई (हातोला) येथील कोंबडबाजारावर यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत दोघेच पोलिसांच्या हाती लागले आहेत. जवळपास सात दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

वाई (हातोला) शिवारात भरणाऱ्या कोंबडबाजारावर लाखोंची उलाढाल होते. मंगळवार, शुक्रवार व रविवार, अशी तीन दिवस येथे जत्रा भरते. लॉकडाउन कालावधीत सर्वकाही बंद असताना कोंबडबाजार बंद करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे तत्कालीन ठाणेदारांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. 

क्लिक करा - ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरासह अमरावती जिल्ह्यातील जुगारी कोंबडबाजार खेळण्यासाठी येतात. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी अवैध धंदे पूर्णता: बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, वाई (हातोला) येथील कोंबडबाजारावर छापा टाकण्यात आला नव्हता. 

अखेर रविवारी ठाणेदार गजानन करेवाड यांनी छापा टाकला. यावेळी दोन व्यक्तींसह सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वृत्तलिहेस्तोवर घटनास्थळावर पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती. या छापेमारीजुगारींत चांगलीच खळबळ उडाली.

हेही वाचा - हृदयस्पर्शी! मुळ गावी जाण्यासाठी कुटुंबीयांसह निघाला पती; वाटेत पत्नीने सोडली साथ, मुलं अनभिज्ञ

माहिती झाली 'लिक'

यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी कोंबड बाजारावर छापा टाकण्याची गुप्त रणनिती आखली होती. त्यानुसार आपल्या खास सात ते आठ पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले. पोलिस येत असल्याची माहिती आधीच लिक झाली. त्यामुळे जुगारी पळून जाण्यात यशस्वी झालेत. मात्र, छापेमारीची माहिती देऊन "प्रकाश'ला वाचविणारा कर्मचारी कोण, ही चर्चा चांगलीच रंगली होती.

संपादन - अथर्व महांकाळ