बिनधास्त खा गुटखा, कारण येथे किराणा दुकानतही मिळतो

संतोष ताकपिरे
Thursday, 17 September 2020

शहरातील बहुतांश किराणा मालविक्रीच्या ठिकाणीसुद्धा प्रतिबंधित गुटख्याची सर्रासपणे विक्री होते. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला.

अमरावती : केवळ पानटपरीसह मोठ्या प्रतिष्ठानांतच गुटखा मिळतो असे नाही तर, शहरातील बहुतांश किराणा मालविक्रीच्या ठिकाणीसुद्धा प्रतिबंधित गुटख्याची सर्रासपणे विक्री होते. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला.

गुन्हेशाखेसह संबंधित पोलिसांनी शहरातील दोन दुकानांवर छापे टाकून प्रतिबंधित गुटखा जप्त केला. शिवाय एक कारमधूनही गुटख्याचा माल जप्त केला असून दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत चौघांना अटक केली. राजापेठ हद्दीत राहुल श्‍यामलाल यादव यांचे बेलपुरा येथील कृष्णम या किराणा दुकानातून अवैधरीत्या विक्रीसाठी ठेवलेला २ हजार ६०५ रुपयांचा गुटखा जप्त केला.

वाचा - हवा के साथ साथ, ओ साथी चल! आता हवेवर धावणार "बाइक

हा गुटख्याचा माल यादव याने एमएच १३ एसी १८९३ क्रमांकाच्या कारचालकाने आणून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी चित्राचौक परिसरात या कारची पोलिसांनी झडती घेतली असता कारमधून ५६ हजार १०० रुपयांचा गुटखाही जप्त केला. जप्त कार व दोन ठिकाणच्या गुटख्याची एकूण किंमत १ लाख ५८ हजार ७०५ असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवाय कारमधील शेख अशफाक शेख मुनाफ या दोघांकडे हा माल आढळला. याव्यतिरिक्त खोलापुरीगेट ठाण्याच्या हद्दीत अंबागेट येथील श्रीनिवास राधाकिसन झंवर (वय ५४) यांच्या कृष्णा सोनपापडी ऍण्ड फरसाणच्या दुकानातसुद्धा कारवाईदरम्यान ४५ हजार ५५ रुपयांचा गुटखा विक्रीसाठी ठेवला असल्याचे निदर्शनास आले. झंवर यास पोलिसांनी अटक केली.  

संपादन - नरेश शेळके

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Seized huge quantity of illegal Gutka Packets

Tags
टॉपिकस
Topic Tags: