गणेशोत्सवात पोलिसांचा कडक बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

नागपूर  : गणेशाचे आगमन सोमवारी होत असल्याने पोलिस विभागाची बंदोबस्ताची परीक्षा सुरू झाली आहे. येणाऱ्या 12 दिवस पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.

नागपूर  : गणेशाचे आगमन सोमवारी होत असल्याने पोलिस विभागाची बंदोबस्ताची परीक्षा सुरू झाली आहे. येणाऱ्या 12 दिवस पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.
2 ते 12 सप्टेंबरपर्यंत शहरात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. शहरात अंदाजे 1,138 सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात घरगुती गणेशमूर्ती स्थापनासुद्धा होणार आहे. गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी आणि हा उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांच्या आदेशान्वये आणि अपर पोलिस आयुक्त नीलेश भरणे, महावारकर आणि जी. बी. गायकर यांच्या देखरेखीत बंदोबस्त लावलेला आहे. तब्बल साडेतीन हजार पोलिस कर्मचारी गणेशोत्सवात डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करणार आहेत.
पाच उपायुक्‍त बंदोबस्तात
शहरात परिमंडळनिहाय बंदोबस्त लावलेला आहे. यात पाच पोलिस उपायुक्त, 10 सहायक पोलिस आयुक्त, 56 पोलिस निरीक्षक, 206 सहायक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, 1,817 पुरुष पोलिस कर्मचारी व 277 महिला पोलिस कर्मचारी, 700 पुरुष होमगार्ड व 300 महिला होमगार्ड तसेच राज्य राखीव पोलिस दल यांची एक कंपनी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नियंत्रण कक्ष येथे चार राखीव पथक, क्‍यु.आर.टी., रा.रा.पो.बल गट, आरसीपी पथके राखीव ठेवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police tighten arrangements at Ganeshotsav