गरिबांच्या पोरांची दिल्लीवारी! अभ्यास करून परतणार विमानाने 

सचिन शिंदे 
सोमवार, 13 जानेवारी 2020

आर्णी तालुक्‍यातील केळझरा तांडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेचे विद्यार्थी 27 जानेवारी 2020 रोजी दिल्लीमध्ये असलेल्या ऐतिहासिक वास्तू, पर्यटन स्थळे, संसद भवन, राष्ट्रपती भवनचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला जात आहेत. 

आर्णी (जि. यवतमाळ) : वेगाने बदलत चाललेल्या समाजाचे वास्तव चित्र आणि शिक्षणात होत असलेले अत्याधुनिक बदल प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी दिल्लीला अभ्यास दौऱ्यावर जात आहेत. 

केळझरा तांडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेचे विद्यार्थी

आर्णी तालुक्‍यातील केळझरा तांडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेचे विद्यार्थी 27 जानेवारी 2020 रोजी दिल्लीमध्ये असलेल्या ऐतिहासिक वास्तू, पर्यटन स्थळे, संसद भवन, राष्ट्रपती भवन यांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल शिक्षण देत असलेल्या शाळा आणि त्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या शैक्षणिक बदलांचा अभ्यास करण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना शाळेतील शिक्षक दिल्लीला घेऊन जात आहेत. 

वाचा ही विशेष बातमी... चला मॉलमध्ये तुम्हाला आजीबाई दाखवतो 

नागपूर येथून रेल्वेने दिल्लीला जाणार

या नशीबवान विद्यार्थ्यांमध्ये मयुरी निलकंठ जाधव, सलोनी संतोष चव्हाण, मयुरी गणेश राठोड, पूनम संतोष जाधव, विशाखा गुणवंत राठोड, साहील उदयसिंग जाधव, अंकेश रामेश्वर पवार, अभिषेक बाबुसिंग पवार, दुर्गेश सुभाष राठोड, गौरव टिकाराम चव्हाण यांचा समावेश असून या विद्यार्थ्यांसोबत शिक्षक कैलास आनंद नेमाडे, तुकाराम धोंडिबा चव्हाण, सुरेश रामदास पवार दिल्लीला जाणार आहेत. हे सर्वजण27 जानेवारी 2020 रोजी नागपूर येथून रेल्वेने दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीमध्ये पाच दिवस अभ्यास करून 31 जानेवारीला विमानाने नागपूरला परतणार आहेत. या अभ्यास दौऱ्यासाठी जवळपास 85 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. 30 हजार रुपये समग्र शिक्षा अभियान देणार असून 15 हजार रुपये शिक्षकांनी जमा केले, तर 10 हजार रुपये पालकांनी गोळा केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor students will go to Delhi for study! will return by plane