esakal | Crime : महिलेच्या बनावट फेसबुक अकाउंटवरुन अश्लील चॅटिंग
sakal

बोलून बातमी शोधा

facebook crime

Crime : महिलेच्या बनावट फेसबुक अकाउंटवरुन अश्लील चॅटिंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : गावातील एका महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे अश्लील चॅटिंग केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी संशयित चरण बाळूभाऊ बोदुडे (वय 26) या युवकास बुधवारी (ता. 13) अटक केली.

हेही वाचा: Akola : मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करणाऱ्यांना २० वर्षांची शिक्षा

चरण याने एका विवाहित महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्यानंतर गावातील काही लोकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली. अनेक जण महिला ओळखीतील असल्याने त्यांनी फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारली. त्याआधारे चरण याने स्वत: इतर महिला व लोकांसोबत चॅटिंग सुरू केली. बरेच दिवस हाप्रकार सुरू होता. महिलेच्या संपर्कातील काही नातेवाइकांनी घटनेची माहिती त्यांना दिली. अनेकदा त्यामध्ये अश्लील चॅटचा सुद्धा समावेश होता.

महिलेने सायबर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली असता, पोलिसांनी 6 ऑक्टोंबर 2021 रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी याप्रकरणात तांत्रिक पद्धतीने तपास करून चरण बोदुडे यास अटक केली. त्याने ज्या मोबाईलचा बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यासाठी वापर केला होता तो मोबाईल जप्त केला.

चरणला बुधवारी (ता.13) सायबर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक सीमा दाताळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र सहारे, उपनिरीक्षक कपिल मिश्रा, चैतन्य रोकडे, शैलेंद्र अर्डक, प्रशांत मोहोड, उमेश भुजाडे, गजानन पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा: शरद पवार यांचा न्यायालयांवर विश्वास आहे की नाही? - फडणवीस

परिणामाची त्याला कल्पनाच नव्हती

गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी चौकशी केली असता, तक्रार करणारी महिला सोशल मिडीयाचा वापरच करीत नसल्याचे तिने सांगितले. संशयित युवकास असे कृत्य करण्यामागचे कारण विचारले असता, त्याने या गोष्टीचे असे परिणाम होतील याची कल्पना नसल्याचे अधिकाऱ्यांपुढे सांगितले.

loading image
go to top