esakal | Sharad Pawar : शरद पवार यांचा न्यायालयांवर विश्वास आहे की नाही? - फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar_Devendra Fadnvis

शरद पवार यांचा न्यायालयांवर विश्वास आहे की नाही? - फडणवीस

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यात तपास यंत्रणांच्या कारवायांवर टीका करणाऱ्या शरद पवार यांना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही पवार टीका करतात त्यामुळे त्यांचा न्यायालयांवर विश्वास आहे की नाही? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडलेल्या मुद्द्यांवर फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना त्यांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: एनसीबी, सीबीआय आणि ईडीचा भाजप वापर करतेय - शरद पवार

फडणवीस म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावर जी काही कारवाई झाली ती हायकोर्टाच्या आदेशानं झाली. हायकोर्टानं यासंदर्भात सीबीआय चौकशीचा निर्णय दिला आहे. खरतरं राज्यात सरकार आल्यानंतर सीबीआयनं आमच्या राज्यात चौकशीच करु नये, असं सांगितल्यामुळे ज्यांनी महाराष्ट्राचे किंवा देशाचे पैसे बुडवले अशा ८० बँक घोटाळ्याचे सीबीआयला मान्यता न दिल्यामुळं धुळखात पडली आहेत. पण देशमुख प्रकरणात स्वतः हायकोर्टानं या ठिकाणी निर्णय दिला आणि सीबीआयला चौकशीचे निर्देश दिले. त्यामुळे आमचा प्रश्न आहे की पवारांना हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे की नाही? कोर्टाने दिलेले आदेश पाळायचे की नाही? ज्या प्रकारे या संस्थांना राज्यात वागवलं जात आहे. ते देखील कुठेतरी आक्षेपार्ह आहे, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: मोठा निर्णय! ब्रिटनहून भारतात येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइनमधून सूट

शरद पवारांची पत्रकार परिषद कशासाठी होच माझ्या लक्षात आलं नाही. उत्तर प्रदेशातील घटनेसाठी तुम्ही इथं बंद करता आणि धुडगुस घालता. इथे अक्षरशः हिंसा होते. राज्यकर्ते लोकांवर दबाव टाकतात, लोकांना बंद करायला भाग पाडतात, त्यांना मारहाण करतात इतकंच नव्हे त्यांचा माल घेऊन पळून जातात आणि पोलीस बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळं हे नेमकं कुठलं राज्य आहे? असा प्रश्न आम्हाला विचारायचंय. महाराष्ट्रात झालेला बंद हा स्टेट स्पॉन्सर्ड भीता दाखवून केलेला बंद होता, असा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.

loading image
go to top