esakal | पोषण आहारावर भरारी पथकाची नजर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पोषण आहारावर भरारी पथकाची नजर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पोषण आहाराबाबतच्या तक्रारी वाढत आहे. पोषण आहारावर नजर ठेवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय यादव यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी (ईओ) यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक नियुक्त केले आहे. हे पथक प्रत्येक महिन्यात किमान 10 शाळांची तपासणी करेल. निकृष्ट आहार आढळल्यास संबंधित शाळा आणि पुरवठादारावर कारवाई होणार आहे.
विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात आहार देणे, पुरवठादाराकडून निकृष्ट दर्जाचा माल शाळांना पुरवणे आदी तक्रारी पालकवर्गांच्या आहेत. त्यामुळे ही पथके तत्काळ नेमून तपासण्या करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या सीईओंना दिले आहेत. त्यानुसार आता जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाचा शाळांवर "वॉच' राहणार आहे. पथकाला धान्य पुरवठादारांच्या गोदामांची आणि शाळांची तपासणी करायचे आदेश आहेत.

loading image
go to top