अमरावती मुख्यालयातील सहाय्यक आयुक्तपद रद्द, मनपात शीतयुद्ध पेटण्याची शक्यता

कृष्णा लोखंडे
Saturday, 28 November 2020

महापालिकेत सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून महापौर व आयुक्तांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. उपायुक्त (सामान्य)या पदावर सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे यांची नियुक्ती आयुक्तांनी केली. त्याला महापौरांचा तीव्र आक्षेप आहे.

अमरावती : उपायुक्तांवरील कामाचा ताण कमी व्हावा या उद्देशातून निर्माण करण्यात आलेले सहाय्यक आयुक्त मुख्यालय हे पद आयुक्तांनी रद्द केले आहे. त्यांच्याकडील कारभार दोन उपायुक्तांना विभागून देण्यात आला असून सहाय्यक आयुक्तांना त्यांच्यामुळे आस्थापनेसह झोन क्रमांक दोनच्या सहाय्यक आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे.

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

महापालिकेत सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून महापौर व आयुक्तांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. उपायुक्त (सामान्य)या पदावर सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे यांची नियुक्ती आयुक्तांनी केली. त्याला महापौरांचा तीव्र आक्षेप आहे. महापौरांनी शिफारस केलेल्या अधिकाऱ्यास नियुक्ती देण्यात आली नसल्याने व त्यासाठी तांत्रिक कारण समोरे केल्याने महापौर दुखावले आहेत. हा वाद कायद्याच्या कसोटीवर आला असतानाच आयुक्तांनी सहाय्यक आयुक्त मुख्यालय हे पदच रद्द करून आगीत तेल ओतण्याचा प्रकार केल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा - लाडक्या नेत्यास अखेरचा निरोप देण्यासाठी उसळली हजारोंची गर्दी; माजी आमदार अनंतराव देवसरकर अनंतात...

महापालिकेत उपायुक्तांची दोन, तर प्रत्येक झोननिहाय पाच सहाय्यक आयुक्तांची पदे आहेत. यापैकी केवळ झोन क्रमांक एकला त्या दर्जाचा अधिकारी आहे. उर्वरित चारपैकी दोन हमालपुरा व भाजीबाजार या दोन झोनच्या सहाय्यक आयुक्तपदी अभियंते आहेत. रामपुरी कॅम्प कृष्णानगर या झोन क्र. 1 च्या सहाय्यक आयुक्तपदी सांख्यिकी अधिकारी आहेत. त्यांची पात्रताही आहे. मध्य झोनची जबाबदारी आतापर्यंत विधी अधिकाऱ्याकडे होती, ती आता मुख्यालयाचे सहाय्यक आयुक्तांना प्रभारी म्हणून सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा - सील झालेले 'आरओ' प्लांट फक्त एका अटीवर होणार सुरू?

शासनाने दोन प्रशिक्षणार्थी सहाय्यक आयुक्त दिले आहेत. त्यांना कोविड विभागात जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. सद्यःस्थितीत महापालिकेत परिपूर्ण सहाय्यक आयुक्तांचा वानवा आहे. अशातच सहावे निर्माण करण्यात आलेले मुख्यालयातील सहाय्यक आयुक्तपद रद्द करण्यात आले. त्यांच्याकडील विभाग दोन उपायुक्तांमध्ये विभागण्यात आले आहेत. आयुक्तांच्या या कृतीचे पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: post of assistant commissioner at amravati headquarters canceled

Tags
टॉपिकस
Topic Tags: