
शेगाव : बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्पात भुसंपादन झालेल्या शेतीचा जास्तीचा मोबदला मिळवून देण्यासाठी खंडणी घेणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर यांच्यावर शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आज शेगावातील जिगाव कार्यालयात प्रशांत डिक्करला शेतकऱ्यांकडून लोटपाट देखील करण्यात आली असून पोलिसांनी डिक्कर यांना अटक केली आहे.