Hair Loss Research : जाधव यांची केस गळती बाधित गावांना भेट; संशोधनासाठी आयसीएमआर शास्त्रज्ञांची टीम येणार असल्याची दिली माहिती
CMR team investigation of mysterious hair loss disease in affected villages : प्रतापराव जाधव यांनी केस गळतीच्या आजाराने बाधित गावांना भेट दिली. या विक्षिप्त आजारावर संशोधन करण्यासाठी दिल्ली आणि चेन्नई येथून तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आयसीएमआरचे शास्त्रज्ञ यांची टीम दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेगाव : केस गळती हा आजार कशामुळे झालाय हे शोधण्यासाठी दिल्ली चेन्नई येथून विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची टिम बोलविण्यात आली आहे.आयुर्वेद युनानी, होमिओपॅथी, ॲलोपॅथीच तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आयसीएमआरचे शास्त्रज्ञ या विचित्र केस गळती आजारावरचे संशोधन करीत आहे.