गुलाबराव इंगळे
जळगाव (जामोद): सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी तालुक्यातील भेंडवळ येथील रामचंद्र महाराज यांनी सुरू केलेली अक्षय तृतीया घट मांडणीची परंपरा आजही कायम असून १ मे अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी रामचंद्र महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि त्यांचे सहकारी सारंगधर पाटील वाघ यांनी या घट मांडणीचे भाकीत जाहीर केले आहे. गेल्या ४५वर्षांमध्ये जे घडले नाही असे भाकीत त्यांनी वर्तवले असून पृथ्वीचा विनाश म्हणजे पृथ्वीवरील बऱ्यापैकी लोकसंख्येचा नाश होईल आणि या देशाचा राजा हा संकटात राहील. सध्याच्या सहकारी पक्षांकडून त्यांचे आधार काढले जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे.