Gadchiroli News: गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात पूरपरिस्थितीत अडकलेल्या गर्भवती महिलेचा एस.डी.आर.एफ. पथकाने जीव वाचवला. तिने सुरक्षित रुग्णालयात गोंडस कन्येला जन्म दिला.
गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस असला, तरी भामरागड तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून त्यात भर म्हणून छत्तीसगड राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.