किंमत वाढली; डच, बटरला पसंती !

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 February 2020

व्हॅलेंटाईन डेच्या पुर्वसंध्येला बाजारपेठा गजबजल्या ः तरुणाईकडून गुलाब पुष्प खरेदीसाठी झुंबड

अकोला : दोन निस्सीम प्रेम करणाऱ्यांच्या हृदयात हमखास आढळते ते गुलाब. जुन्या काळापासून अगदी आत्ताच्या तरुणाईच्या आजी-आजोबांच्या काळापासून प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाला पसंती मिळाली आहे. पण प्रेमाच्या गुलाबावर व्हॅलेंटाई-डे च्या पुर्वसंध्येला महागाईचे संकट दिसून आले आहे. डच गुलाबाला सर्वाधिक मागणी असून, लाल गुलाबाला साठ रुपयांपासून एकशे तीस रुपये तर पिवळ्या गुलाबाला पन्नास रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत किंमत आहे. साध्या गुलाबगड्डीचा (10 ते 12 फुले) दर पन्नास ते शंभर रुपये इतका आहे.

 

प्रेम व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम गुलाबाचे फूल मानले जाते. अनेक शब्दांतून जे व्यक्त होऊ शकणार नाही, ते गुलाबाचे एक सुंदर फूल सांगून जाते. यामुळेच की काय, व्हॅलेंटाइनच्या दिवशी बहुतांश प्रेमी त्यांचे प्रेम गुलाबाचे फूल देऊन व्यक्त करीत असतात. गुलाब आणि व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशनचे अतूट नाते आहे. प्रेमवीरांमध्ये गुलाबाची देवाण-घेवाण फारच लोकप्रिय आहे. लाल रंगाच्या गुलाबाला ‘व्हॅलेंटाइन डे’ला अधिक मागणी असते. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक मानला जातो तर पांढरा गुलाब शांती व पिवळा गुलाब मित्रत्वाचे प्रतीक मानले जाते. गुलाबाच्या अप्रतिम सौंदर्याने आणि थेट भावनेला हात घालण्याच्या क्षमतेमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून ‘व्हॅलेंटाइन डे’ ला गुलाबांची विशेष मागणी असते. फुलांची मागणी वाढल्याने आज त्याचे दर दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. शुक्रवारी ‘व्हॅलेंटाइन डे’ असल्यामुळे गुलाबांच्या फुलांना बाजारात चांगली मागणी आहे. डच गुलाबाला सर्वाधिक मागणी असून, लाल गुलाबाला साठ रुपयांपासून एकशे तीस रुपये तर पिवळ्या गुलाबाला पन्नास रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत किंमत आहे. साध्या गुलाबगड्डीचा (10 ते 12 फुले) दर पन्नास ते शंभर रुपये इतका आहे.

फुलांची आवक वाढली
बोडरे, ट्रॉजिकल, प्रेसिडेंट, गोल्डन स्ट्राइक अशा वेगवेगळ्या जातींच्या गुलाबांची बाजारात आवक आहे. दोन-तीन आठवड्यांपासून गुलाबांना चांगला भाव आहे. व्हॅलेंटाइनमुळे फूल बाजारातील दर वीस ते चाळीस रुपयांनी वाढले आहेत. मागीलवर्षी डच गुलाबाचा दर अडीचशे रुपयांपर्यंत गेला होता. व्हॅलेंटाइन ड ला लाल, पिवळा, सफेद, गुलाबी रंगात असणाऱ्या चायना गुलाबाच्या फुलांना ग्राहकांची जास्त पसंती असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: price high, dutch and butter roes most lick