शीतल आमटेंच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला समोर

बाळू जीवने
Wednesday, 30 December 2020

महारोगी सेवा समितीची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे करजगी यांनी गेल्या ३० नोव्हेंबरला आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त कळताच संपूर्ण आनंदवन आणि कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली होती

वरोरा (जि. चंद्रपूर) : डॉ. शीतल आमटे यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये डॉ. शीतल यांचा श्वास रोखल्याने मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी गेल्या ३० नोव्हेंबरला आत्महत्या केली असून आज त्यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण झाला आहे.

हेही वाचा - ED कारवाईत सुसाट, मात्र गुन्हे सिद्ध करण्यात नापास; पाहा रिपोर्टकार्ड

महारोगी सेवा समितीची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे करजगी यांनी गेल्या ३० नोव्हेंबरला आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त कळताच संपूर्ण आनंदवन आणि कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली होती. त्यांनी खोलीत इंजेक्शन आणि विषारी औषध आढळून आले होते. त्यांनी आपल्या उजव्या हाताला इंजेक्शन टोचले होते. चंदपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन झाले. त्याचा प्राथमिक अहवाल अलीकडेच मिळाला. मात्र, त्यावर पोलिस प्रशासनाने बोलणे टाळले होते. आता त्यांचा मूत्यू श्वास रोखल्याने झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. नागपूर येथील न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेतील अंतिम शवविच्छेदनाचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. 

हेही वाचा - चिमुकल्यांच्या पाळण्याजवळ सळसळताना दिसला भला मोठा साप...

न्यायवैद्यकीय अहवाल आणि इतर अहवाल अजून आले नाही. ते आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. 
-नीलेश पांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, वरोरा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: primary post mortem report of dr sheetal amte reveal