चिमुकल्यांच्या पाळण्याजवळ सळसळताना दिसला भला मोठा साप, मांजरींनी पंजाने केले ठार

two girls are safe due to three cats killed snake in jamli of amravati
two girls are safe due to three cats killed snake in jamli of amravati

जामली(अमरावती) : धामणगावगढी येथील गायीच्या गोठ्यात खेळत असलेल्या मुलींच्या झोळीजवळ आलेल्या सापाला तीन मांजरींनी आपल्या पंजांनी मारून ठार केले. त्यामुळे दोन लहान मुलींचा जीव वाचला. मांजरी नसत्या तर मोठा अनर्थ घडला असता. 

अचलपूर तालुक्‍यातील धामणगावगढी ते चिखलदरा रोडवर ओंकार गोविंद शेळके यांचे शेत आहे. तसेच रोडच्या कडेलाच जय भोले ट्रेडर्स असून या ट्रेडर्सच्या मागे गायीचा गोठा आहे. या गोठ्यात गायी व म्हशी बांधलेल्या असून सोबतच गणू, मनू व जणू नावाच्या मांजरी पण राहतात. सोबतच दिवसभर ओंकार शेळके यांची नातवंडसुद्धा याच गोठ्यात पाळणा बांधून खेळत असतात. येथे भलामोठा नाग जातीचा साप मुली खेळत असलेल्या पाळण्याजवळ येऊन फिरू लागला. तेवढ्यात जणू, गणू व मनू या मांजरींनी या भल्यामोठ्या सापाला पाहिले व पाळण्याजवळ संरक्षण करण्यासाठी सज्ज झाल्या.

साप मोठमोठ्याने फुत्कारू लागला. जसजसा पाळण्याकडे वळू लागला तसतशा मांजरी आपल्या पंजाने त्या सापावर प्रहार करीत होत्या. हा प्रकार काही तास चालला. काही वेळानंतर घर मालकाला लक्षात आले. आरडाओरड केली असता शेतकरी मदतीला धावून आले. तोपर्यंत गणू, मनू व जणूने या तिन्ही मांजरांनी जिवंत सापाला आपल्या पंजाने ठार मारले होते. हा प्रकार काहींनी आपल्या नजरेने पाहिला व तिन्ही मांजरींचे कौतुक केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com