esakal | पंतप्रधान दौऱ्यावरून महामेट्रो, पोलिसांची धावाधाव
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान दौऱ्यावरून महामेट्रो,  पोलिसांची धावाधाव

पंतप्रधान दौऱ्यावरून महामेट्रो, पोलिसांची धावाधाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : हिंगणा मार्गावर मेट्रोच्या प्रवासी सेवेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून पोलिस, महामेट्रो प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. या दौऱ्याबाबत उद्या, सकाळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या रामनगर निवासस्थानी महामेट्रोचे अधिकारी, पोलिस, वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
लोकमान्यनगर ते सिताबर्डी या हिंगणा मार्गावरील मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. येत्या 3 तारखेला सीएमआरएसचे पथकही मार्गावरील मेट्रोच्या सुविधांची तपासणी करणार आहे. सीएमआरएसकडून मंजुरी निश्‍चित समजली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 सप्टेंबरला मेट्रोचे लोकार्पण करण्यासाठी नागपुरात येत असल्याचे सुत्राने नमुद केले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे आदी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी पोलिस प्रशासन, महामेट्रो प्रशासन कामाला लागले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या रामनगर निवासी सर्वच अधिकाऱ्यांची बैठक उद्या, रविवारी सकाळी होणार असल्याचे सुत्राने नमुद केले.
 
loading image
go to top