पंतप्रधान करणार सुभाषनगरपर्यंत मेट्रो सफारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 सप्टेंबरला सुभाषनगर स्टेशनपर्यंत मेट्रोतून सफारी करणार आहेत. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान महापालिकेच्या काही प्रकल्पांचे लोकार्पणही करण्याची शक्‍यता आहे. यावेळी पंतप्रधान बहुप्रतीक्षित गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचेही लोकार्पण करणार असल्याचे सूत्राने नमूद केले. या दौऱ्यानिमित्त सुरक्षा, पंतप्रधानांचा मार्ग आदीबाबत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आढावा घेतला.

नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 सप्टेंबरला सुभाषनगर स्टेशनपर्यंत मेट्रोतून सफारी करणार आहेत. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान महापालिकेच्या काही प्रकल्पांचे लोकार्पणही करण्याची शक्‍यता आहे. यावेळी पंतप्रधान बहुप्रतीक्षित गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचेही लोकार्पण करणार असल्याचे सूत्राने नमूद केले. या दौऱ्यानिमित्त सुरक्षा, पंतप्रधानांचा मार्ग आदीबाबत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आढावा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंगणा मार्गावरील मेट्रोला हिरवी झेंडी दाखविणार आहे. 7 सप्टेंबरला आयोजित या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आज प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित, मनपा आयुक्त अभिजित बांगर, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महामेट्रोचे कार्यकारी संचालक अनिल कोकाटे आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 7 सप्टेंबरला विविध तीन शहरांत कार्यक्रम आहेत. नागपुरात ते शेवटचा कार्यक्रमासाठी येणार आहेत. नागपुरात दुपारी साडेचार वाजता ते दाखल होणार आहे. ते लोकमान्यनगर ते सीताबर्डी मेट्रो रेल्वेला हिरवी झेंडी दाखविणार आहेत. यावेळी या मार्गावरील सुभाषनगर स्टेशनपर्यंत मेट्रोतून सफारी करणार आहेत. त्यानंतर ते कस्तुरचंद पार्कवर येतील. येथे जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या नियोजित कार्यक्रमात अद्याप महापालिका प्रकल्पाच्या लोकार्पण किंवा भूमिपूजन कार्यक्रमाचा समावेश नाही. परंतु, महापालिकेकडून पंतप्रधान कार्यालयाला मनपा प्रकल्पाचे लोकार्पण किंवा भूमिपूजन करण्याबाबत पत्र पाठविणार असल्याचे सूत्राने नमूद केले. या विविध कार्यक्रमानिमित्त पंतप्रधानांची कडेकोट सुरक्षा व्यवस्थेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पोलिस प्रशासनाला निर्देश दिले. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे 7 सप्टेंबरला काही मार्ग वळविण्यात येणार आहेत. याबाबत त्यांनी वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनाही सूचना केल्या. पंतप्रधान व्हीएनआयटीच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमातही उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे.

मेट्रोची कामे युद्धपातळीवर
10.5 किमीच्या हिंगणा मार्गावर मेट्रोची सेवा सुरू करण्यासाठी युद्ध स्तरावर कार्य सुरू आहे. नुकत्याच चीन येथून आणलेल्या तिन्ही मेट्रो कोचेसचे परीक्षण करण्यात येत आहे. ट्रॅक आणि केबलच्या कार्यासह सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर "एक्वा लाइन प्लेटफॉर्म'चे कामेही अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावरील संपूर्ण ट्रॅक व पिलरची रंगरंगोटी करण्याचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister to Subhash Nagar to Metro Safari