Gondia News: गोंदियातील एका मुख्याध्यापकाला अटक; एसआयटीची कारवाई, दोन बोगस शिक्षकांची नियुक्ती
Fake Teacher Scam: गोंदियातील एक मुख्याध्यापक आणि शिक्षण संस्थेचे सचिव बोगस शाळार्थ आयडी प्रकरणात अटक झाले आहेत. याआधी दोन बोगस शिक्षकांची अटक झाली होती.
नागपूर : बोगस शालार्थ आयडी प्रकरणात पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) गोंदियातील एका शिक्षण संस्थेचे सचिव आणि मुख्याध्यापकाला मंगळवारी (ता.२२) सायंकाळी मरदोली गावातून अटक केली आहे. याआधी गोंदियातील दोन शिक्षकांना सायबर पोलिसांनी अटक केली होती.