esakal | खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस उत्पादक शेतकर्‍यांची लूट; हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

private businessmen buying cotton in less rates from farmers

 मागील वर्षी शेतकऱ्याचे कापूस सीसीआय मार्फत खरेदी करण्यात यावे व शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात यावा यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा सुदर्शन निमकर आणि ज्ञानेश्वर बेरड या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस उत्पादक शेतकर्‍यांची लूट; हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी

sakal_logo
By
आनंद चलाख

राजुरा (जिल्हा चंद्रपूर) :सणासुदीच्या हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून लयलूट सुरू आहे. कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. गरजेपोटी शेतकरी खासगी व्यापाऱ्यांला कापूस विक्री करीत आहे.परंतु खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून शासकीय हमिभवापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी करीत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण सुरू आहे मात्र यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

 मागील वर्षी शेतकऱ्याचे कापूस सीसीआय मार्फत खरेदी करण्यात यावे व शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात यावा यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा सुदर्शन निमकर आणि ज्ञानेश्वर बेरड या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची दखल उच्च न्यायालयाने घेतलेली होती त्यानंतर सीसीआयने सर्व शेतकऱ्यांचे कापूस खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. 

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

यावर्षीही मात्र शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे.त्यामुळे राजुरा, कोरपना, जिवती ,गोंडपिप्री तालुक्यात बहुतांश भागात शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली आहे.परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला.कापूस पिकांसह अन्य पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.खरीप हंगामातील कापूस निघायला लागला असून शेतकरी कापसाची वेचणी करण्यात व्यस्त आहे.मात्र अचानक कापसाच्या पिकांवर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने आता पीक हाती येईल की नाही याची कोणतीच शाश्वती शेतकऱ्यांना उरली नाही.

बोंड अळीचा शेतकऱ्यांनी धसका घेतल्याने शेतकरीही चिंतेत आहे. सणासुदीच्या दिवसात आर्थिक गरजेपोटी शेतकरी कापूस विक्रीसाठी नेत आहे.परंतु शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेत खासगी व्यापारी कवडीमोल भावाने कापसाची खरेदी करीत आहे. कापसाला५ हजार ८२५ रुपये हमीभाव आहे.मात्र  कापसात मोठ्या प्रमाणात ओलाव्याचे कारण सांगत खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाची अक्षरशः लूट सुरू आहे. 

शासनाकडून यंदा कापसाला ५८०० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव निश्चित करण्यात आला आहे. मात्र, हा हमीभाव निश्चित केला असला तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना याचा लाभ नाही. खाजगी व्यापारी कमी दराने खरेदी करीत आहेत.  हमी भावापेक्षा कमी भावाने कापूस खरेदी करणे नियमबाह्य असताना खासगी व्यापारी नियम धाब्यावर बसवून कापसाची लूट करीत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यामुळे हमीभावापेक्षा कमी दराने  कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा - आता जनावरांचेही ‘पशू आधार कार्ड’; जनावरांची माहिती एकाच क्लिकवर

खासगी व्यापाऱ्यांवर शासनाचे नियंत्रण नाही.......
खासगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी करीत आहे.परंतु शासकीय यंत्रणेचे  दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण सुरू आहे.हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या खाजगी व्यापाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी.
- सुदर्शन निमकर.
माजी आमदार

संपादन - अथर्व महांकाळ