esakal | खासगी शाळांची पालकांना दमदाटी, शुल्क जमा करण्याचे नोटीस
sakal

बोलून बातमी शोधा

private school force to parents for school fee in bhandara

आता दिवाळी जवळ आली. पण, सरकार फक्त ऑनलाइन अभ्यास करण्याचे निर्देश देत आहे. यामुळे शाळांचे मालक अस्वस्थ झाले आहेत. यामुळे त्यांच्याकडून परीक्षा घेण्याच्या बहाण्याने शाळांचे शुल्क मागणीसाठी पालकांना नोटीस, पत्र पाठवले जात आहे.

खासगी शाळांची पालकांना दमदाटी, शुल्क जमा करण्याचे नोटीस

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

भंडारा : लॉकडाउनच्या काळापासून शिक्षण विभागाने शाळा बंद पण शिक्षण सुरू हे धोरण स्वीकारले असून, ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम रेटला जात आहे. मात्र, या क्षेत्रात गुंतवणूक करून शाळा उघडणारे धंदा बंद पडल्याने अस्वस्थ झाले आहेत. आता शाळेत शुल्क जमा करण्यासाठी नोटीस पाठवून पालकांना दमदाटी केली जात आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण केली जात आहे. याबाबत शिक्षण विभागाने निर्देश द्यावे, मागणी पालकांनी केली आहे. 
 
कोरोना संकटामुळे संपूर्ण जगातील उद्योगधंदे बंद पडले आहे. त्याचा परिणाम देशात व राज्यात झाला आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तो सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य आहे. त्यामुळे गेल्या सत्रातील परीक्षा व चालू सत्रातील प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे रखडल्या आहेत. खासगी शाळांमध्ये नवीन वर्गात प्रवेशाच्या दृष्टीने पालकांकडून बराच मोठा खर्च करवून घेतला जातो. यातील मोठा वाटा संस्थेकडे जमा होतो. गणवेश, पुस्तके, साहित्य वाढीव दरात दिल्याने दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. ते सगळे यावर्षी झालेच नाही. त्यामुळे मोठी गुंतवणूक करून शाळांचा धंदा उघडून बसलेले व्यापारी आवक होत नसल्याने त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा - सोहळा धम्मदीक्षेचा : ६४ वर्षांपूर्वी हॉटेल श्याममध्ये थांबले होते बाबासाहेब, निवासाचे बिल ११००...

आता दिवाळी जवळ आली. पण, सरकार फक्त ऑनलाइन अभ्यास करण्याचे निर्देश देत आहे. यामुळे शाळांचे मालक अस्वस्थ झाले आहेत. यामुळे त्यांच्याकडून परीक्षा घेण्याच्या बहाण्याने शाळांचे शुल्क मागणीसाठी पालकांना नोटीस, पत्र पाठवले जात आहे. शाळेचे शुल्क भरले नाही तर, तुमच्या मुलांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती पालकांमध्ये बिंबविण्याचे प्रयत्न या मंडळीकडून होत आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. एका शाळा संस्थापकाने शाळा बंद असली तरी, शुल्क घेऊ नये असे आदेश सरकारने काढलेच नाही, असे विचार त्याच्या मित्रांसमोर मांडले होते. त्याबाबतचे वृत्तही समोर आले होते. त्यामुळे काहीही झाले तरी, कचरापेटीप्रमाणे 'माझा खाऊ मला द्या' हेच त्यांचे धोरण ठरलेले दिसते. त्यामुळे याबाबत शासनाने पालकांची लुबाडणूक थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

हेही वाचा - तुम्ही रात्री घरात येणाऱ्या हिरव्या किड्यांनी त्रस्त आहात; मग ही बातमी तुमच्यसाठीच

शाळा बंद, शुल्क चालू - 

खासगी शाळांपैकी नावाजलेल्या शाळा म्हणून मिरवणाऱ्या शाळांमध्ये वर्ग घेतले नाही. मात्र, पालकांकडून दरमहिन्याचे शुल्क घेतले जात आहे. परंतु, मुलांचा अभ्यासही पूर्ण होत नाही. त्यामुळे पालकांसमोर काय करावे आणि काय करू नये? असे प्रश्‍न पडले आहेत. दिवाळीनंतर शाळा सुरू होईल. तुम्ही शुल्क भरून टाका, असा सल्ला पालकांना दिला जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने ज्या महिन्यात शाळा सुरू होईल. त्याच महिन्यापासून शुल्क घ्यावे, असे निर्देश देऊन शाळांना गप बसवावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
 

loading image