तुम्ही रात्री घरात येणाऱ्या हिरव्या किड्यांनी त्रस्त आहात; मग ही बातमी तुमच्यसाठीच

Green insects also love glare read full story
Green insects also love glare read full story

नागपूर : सध्या शहर रात्री येणाऱ्या किड्यांनी त्रस्त आहे. हे किडे कुठून आले याचा शोध घेतला असता विजेच्या दिव्यांच्या झगमगटाकडे ग्रामीण भागातून ते शहरात आल्याचे समजले. शेतीसाठी घातक असलेले हे किडे आरोग्यासाठी हानिकारक नसल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

हिरवे किडे म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांना शास्त्रीय भाषेत ‘प्लान्ट हापर’ असे संबोधले जाते. हिवाळ्याची चाहूल लागताच हे किडे शहरातील विजेच्या दिव्यांमुळे होणाऱ्या झगमगाटाकडे वळतात. वातावरणात बदल होत असून पावसाळा जाऊन हिवाळा सुरू होतो आहे. मात्र, यादरम्यानच्या कालावधीत असणारी उष्णता यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात हिरवे किडे दिसून येतात.

साधारणतः शेतातील पिकांच्या हिरव्या पानामधील कोशिकांवर हे किडे जगतात. हिवाळ्यात पिकांची कापणी होते. त्यामुळे अन्नाच्या शोधासाठी हे किडे भटकंती करतात. साधारणतः सायंकाळी त्यांची भटकंती सुरू होत असल्याने जिकडे प्रकाश तिकडेच ते जातात. त्यामुळे शहरात रात्री पथदिवे आणि घराघरांमध्ये ते घोंघावताना दिसता. त्यांचा कुठलाच अधिकृत ठिकाणा नाही, हे विशेष...

दोन आठवड्याची लाईफ सायकल

प्लान्ट हापर नावाने ओळखला जाणारा हिरवा किडा याची लाईफ सायकल दोन आठवड्यांची असते. यात एका आठवड्यात त्यांचा जन्म, वाढ आणि प्रजनन होत असते. दुसऱ्या आठवड्यात कोट्यवधीच्या संख्येने तयार होऊन इतरत्र फिरताना दिसतात. थंडी वाढली की, त्यांच्या प्रादुर्भाव कमी होतो.

आरोग्यावर परिणाम नाही
किड्यांमुळे आरोग्यावर परिणाम होतो का, असा प्रश्न अनेकांना पडत असतो. मात्र, या किड्यांचा आरोग्याला कुठलाही धोका नसून केवळ प्रकाशाकडे आकर्षित होतात. याउलट शेतीसाठी हे किडे अत्यंत घातक आहेत. पानावर बसून ते त्या पानातील कोशिकांमधील रस पिऊन टाकतात. विशेष म्हणजे पानाखाली अंडी देत असल्याने वरवरच्या फवारणीचा त्यांच्यावर परिणाम होत नाही, हे विशेष... तसेच वर्षभराने या अंडीतून नव्याने किडे बाहेर पडतात.
- डॉ. मनोज रॉय, अभ्यासक

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com