
कोरोना नावाच्या शत्रूला पराभूत करण्यासाठी प्रशासन जंगजंग पछाडत आहे. दिवसरात्र लढाई सुरू आहे. अशा संकट समयी जनतेला सुखरूप राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडण्यास मज्जाव देखील करण्यात येत आहे. आजाराच्या गांभीर्यामुळे जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचवून दिल्या जात आहे. ज्यांचे पोट भरले आहे,
यवतमाळ : कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूने अवघे जग आपल्या कवेत घेतले. गोरगरिबांचे दोन वेळच्या जेवणासाठी हाल सुरू आहे. संपूर्ण यंत्रणा मानव प्राणी जगावा यासाठी राबत आहे. दुसरीकडे नेटकऱ्यांना अजूनही आजाराचे गांभीर्य कळल्याचे दिसत नाही. त्यांनी समाजमाध्यमाचा बेछूट वापर करीत कोरोनाला मनोरंजनाचा विषय केला आहे.
कोरोना नावाच्या शत्रूला पराभूत करण्यासाठी प्रशासन जंगजंग पछाडत आहे. दिवसरात्र लढाई सुरू आहे. अशा संकट समयी जनतेला सुखरूप राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडण्यास मज्जाव देखील करण्यात येत आहे. आजाराच्या गांभीर्यामुळे जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचवून दिल्या जात आहे. ज्यांचे पोट भरले आहे, अशांना कशाचेही मोल दिसत नाही. सरकारी सुट्ट्यांप्रमाणे नुसती मौज मजा सुरू आहे. ती देखील समाज माध्यमाच्या माध्यमातून.
असे का घडले? - प्रेमप्रकरणातून झाले भांडण अन् युवकाने उचलले हे पाऊल
आपण कोणता संदेश कुणाला आणि कशाला पाठवतो, याचे भान दिसत नाही. आला संदेश दे पाठवून. कोरोनाच्या जनजागृती बाबत काही चांगले संदेश येत आहेत. त्याचे वाचन खरंच होतेय काय, हा प्रश्न आहे. एकाच ग्रुपवर एकच संदेश आलटून पालटून व्हायरल होत आहे. कोरोना आजाराची मस्करी करणारे मनोरंजक किस्सेही शेकडोंच्या घरात आहे. दिवसभर केवळ मनोरंजन म्हणून नेटचा अतिरिक्त वापर वाढत चालला आहे. त्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्याचा फटका मात्र, अत्यावश्यक गरज असणाऱ्यांना बसत आहे.
अत्यावश्यक सेवेत आरोग्य, पोलिस, महसूल, वीज वितरण आदी विभागातील कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. पोलिस आणि वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांसाठी दिवस काय आणि रात्र काय एकच झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या घरातील वातावरण मन सुन्न करणारे आहे. किमान त्याकडे बघून तरी बिनधास्त लोकांनी कोरोनाबाबत गंभीर होणे आवश्यक आहे.