‘शुगर फ्री’चे उत्‍पादन आता अंगणात

Rajendra tale.jpeg
Rajendra tale.jpeg

अकोला : मधुमेहाच्या आजाराने त्रस्त लोकांना आता रोज आणि वर्षभर गोड पदार्थ खाता येणार असून, त्यासाठी लागणारी ‘शुगर फ्री’ सर्वांना अंगणातच उत्पादीत करता येणार आहे. विश्वास बसत नाही ना! पण हे सत्य असून, अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील दिग्रसचे राजेंद्र ताले यांच्या प्रयोगशिल शेतीतून हे साध्य झाले आहे. त्यांनी कोणतेही नवं तंत्रज्ञान न वापारता, त्यांच्या शेतातच ‘स्टिव्हीया’ या रोपांची शेती केली असून, त्यापासून शेकडो रोपंही तयार केले आहेत.


देशातच नव्हे तर जगभरात मधुमेहाच्या आजाराने कोट्यवधी लोक त्रस्त आहेत. त्यांना इच्छा असूनही गोड पदार्थांचा आस्वाद घेत येत नाही. शिवाय दनैदिन आहारातही गोडवा टाळावा लागतो. मात्र कोणताही आरोग्याची समस्या न उद्भवता गोड पदार्थ प्रत्येकाला वर्षभर खाता यावे या सेवाभावी विचाराने राजेंद्र ताले यांनी अत्यल्प जागेत, पोषक वातावरणाची निर्मिती करून ‘स्टिव्हीया’ची शेती केली आहे. आता त्यांचेकडे 250 रोपं तयार असून, एक हजार रोपं निर्मितीचे साहित्य त्यांचेकडे उपलब्ध असल्याचे ते सांगतात. या वनस्पतीपासूनच शुगर फ्री गोळ्या तयार केल्या जात असून, त्यासाठी महिन्याला शेकडो रुपये खर्च करावा लागतो. मात्र या वनस्पतीच्या निर्मितीसाठी व संवर्धनासाठी किंवा उत्पादनासाठी कोणताही अतिरिक्त खर्च न करता वर्षभर निःशुल्क उत्पादन घेता येत असल्याचे राजेंद्र ताले यांनी सांगितले.

अशी केली सुरुवात
अमरावती येथे एका व्यक्तीने स्टिव्हीया लागवडीचा प्रयोग केला होता. तो पाहण्यासाठी राजेंद्र ताले तेथे गेले होते. मात्र आवश्यक वातावरणातच ही रोपं जगतात आणि उन्हाळ्यात ते मरतात, असे त्यांना माहित पडले. परंतु, या शुगर फ्री वनस्पतीचे उत्पादन घ्यायचेच असा निर्धार करीत त्यांनी, सात वर्षांपूर्वी बेंगलोर येथे संपर्क साधत स्टिव्हीयाची पाच रोपे विमानाने मागविली. त्यासाठी प्रति रोप त्यांना हजार रुपये खर्च आला. शेडनेट शिवाय या रोपांना 30 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात ठेवण्यासाठी त्यांनी केळी व पपईच्या बागेत त्यांचे रोपन केले. आता या रोपांपासून त्यांनी शेकडो रोपं तयार केले असून, केवळ अंगणात लावण्यासाठी लोकांना ते उपलब्ध करुन देत आहेत.

असे मिळते उत्पादन
कमी तापमानात तग धरणारे ही वनस्पती दीड महिन्यात उत्पादन देते. स्टिव्हीयाची पाने थेट खाण्यासाठी किंवा पदार्थ तयार करण्यासाठी वापता येतात. तसेच या वनस्पतीची पाने तोडून ती सुकवून ठेवता येतात. ही पाने वर्षभर उपयोगात आणता येतात. चहा, शिरा, लाडू इत्यादी पदार्थ या पानांपासून बनवून खाता येत असल्याचे राजेंद्र ताले यांनी सांगितले.

सहा एकरात अनेक पिकांचे सेंद्रिय उत्पादन
राजेंद्र ताले हे प्रयोगशिल शेतकरी असून, स्टिव्हीया व्यतिरिक्त असमंतरा, ड्रॅगन फुड, नॅचरल कलर, मटारु, काळमेघ इत्यादी औषधी वनस्पती तसेच केळी, पपई, मिरची, हळद, पेरू, लिंबू, सोयाबीन, तूर, मूग, उडिद व इतर पारंपरिक पिकांचेही सेंद्रिय उत्पादन केवळ सहा एक्कर शेतात ते उत्पादन घेतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com