मोजक्याच मागासवर्गीय लोकांची प्रगती : सुशीलकुमार शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vidarbha

मोजक्याच मागासवर्गीय लोकांची प्रगती : सुशीलकुमार शिंदे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : ‘काही मोजक्याच मागासवर्गीय लोकांनी प्रगती केली आहे. त्यांच्याकडे बघून अनेकजण आता आरक्षणाची गरज काय, असा प्रश्न उपस्थित करीत असतात. आजही कोट्यवधींच्या संख्येतील दिन, दलित, आदिवासी समाज हलाखीचे जीवन जगत आहे. अशा समाजाला वीर बापूराव शेडमाके प्रबोधिनी सुरू करून प्रगतशील मार्गावर नेण्याचे कार्य कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

येथून जवळच असलेल्या तळेगाव भारी येथे शनिवारी (ता. 20) वीर बापूराव शेडमाके प्रबोधिनीचे उद्घाटन झाले, त्याप्रसंगी श्री. शिंदे बोलत होते. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, माजी आमदार कीर्ती गांधी, वामनराव कासावार, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, मारोतराव कोवासे, विजय खडसे, आनंद गेडाम, नामदेव उसंडी, जीवन पाटील, मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख, प्रफुल्ल मानकर, भय्यासाहेब देखमुख, मनीष पाटील, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: ...म्हणून माजी आमदार सुनिल शिंदे, राजहंस सिंह यांची निवड

शिंदे म्हणाले की, ‘1970पर्यंत तर आदिवासी व मागासवर्गीय समाजाला योग्य नेतृत्व नव्हते. इंदिरा गांधी यांनी मागासवर्गीयांसाठी विविध कायदे करून त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. आता फक्त 2014नंतरच प्रगती झाल्याचा दिखावा निर्माण केला जात आहे’, अशी टीका श्री. शिंदे यांनी केली. प्रा. पुरके यांनी प्रास्ताविकात प्रबोधिनीची माहिती दिली. ही प्रबोधिनी ‘ओपन फॉर ऑल’ अशा पद्धतीने कार्यरत राहील. बहुजनहितासाठी व मानवी जीवनाशी निगडित विषयांवर येथे मार्गदर्शन करण्यात येईल. सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार शिक्षण आहे. म्हणून या प्रबोधिनीत विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. सूत्रसंचालन अरविंद वाढोणकर यांनी केले. उत्तम गेडाम यांनी आभार मानले.

हेही वाचा: Video : मंजम्मा जोगतींना पद्मश्री प्रदान; राष्ट्रपतींचे मानले आभार!

सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव

प्रबोधिनीच्या निर्मितीत हातभार लावणारे व सामाजिक कार्यात अग्रेसर समाजसेवकांचा यावेळी गौरव करण्यात आला. राहुल शिंदे, मिलिंद फुटाणे, प्रशांत कुसराम, दीपक कोरांगे, माधुरी मडावी, वीज महावितरणचे अधीक्षक अभियंता मडावी, डॉ. चंद्रशेखर कुडमेथे, संभाजी सरकुंडे, राम चव्हाण, अजय घोडाम, सुनील ढाले, एम. झेड. कुमरे, माधव सरकुंडे, महेश कोडापे यांचा सन्मान झालेल्यांमध्ये समावेश आहे.

loading image
go to top