

Breaking Traditions in Shegaon: In-laws Stand by Daughter-in-law for Remarriage
Sakal
खामगाव: जीवनात अचानक कोसळलेल्या दुःखानंतरही माणुसकी, समजूतदारपणा आणि प्रेम यांच्या आधारावर नव्याने उभं राहता येतं, याचं जिवंत उदाहरण आज शेगाव येथे पाहायला मिळाले. सासऱ्यांनी सुनेला लेकीप्रमाणे मान देत तिच्या पुनर्विवाहाचा घेतलेला निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरला. दुःखाच्या खोल दरीतून महानंदा आता नव्या आयुष्याकडे मार्गस्थ झाली. शेगाव येथे पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.