esakal | प्रतिकात्मक पदव्या जाळून शासनाचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

प्रतिकात्मक पदव्या जाळून शासनाचा निषेध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिमूृर (जि. चंद्रपूर) : चिमूृर विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारांचा प्रश्‍न घेऊन आम आदमी पार्टीचे प्रा. डॉ. अजय पिसे यांच्या नेतृत्वात प्रतिकात्मक पदव्या जाळून शासनाचा निषेध केला.
चिमूर क्रांती स्थळ किल्ला मैदान येथून दुपारी 4.45 च्या दरम्यान शहिदांच्या स्मृतीस अभिवादन करीत शहराच्या मुख्य मार्गाने रॅली तहसील कार्यालयात पोहोचली. येथेच प्रतिकात्मक पदव्यांचे दहन करण्यात आले. बेरोजगारी सुटण्यासाठी विधानसभा क्षेत्रात रोजगारासाठी उद्योग उभारावा, नोकरीसाठी संधी उपलब्ध करून द्यावी, बेरोजगारांना उद्योगासाठी प्रोत्साहनात्मक उपक्रम राबवावे, आर्थिक उत्पन्न सुरू होण्यापर्यंत शासनाने मदत करावी, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

loading image
go to top