लॉजमध्ये चालत होता वेश्या व्यवसाय

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 December 2019

एका गेस्ट हाऊसमध्ये देहविक्रीचा धंदा सुरू असल्याचा खबरीवरून शेगाव पोलीसांनी मंगळवारी 10 डिसेंबर रोजी सायंकाळी छापा टाकला असता दोन पिडीत महिलांसह 4 आरोपींना पकडून त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली. सदर कारवाई शेगाव शहर पोलीसांनी केली आहे. 

शेगाव (जिल्हा बुलडाणा) : शहरातील एका गेस्ट हाऊसमध्ये देहविक्रीचा धंदा सुरू असल्याचा खबरीवरून शेगाव पोलीसांनी मंगळवारी 10 डिसेंबर रोजी सायंकाळी छापा टाकला असता दोन पिडीत महिलांसह 4 आरोपींना पकडून त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली. सदर कारवाई शेगाव शहर पोलीसांनी केली आहे. 

पोलीसांनी काल ता.10 मंगळवारी सायंकाळी 7 वाजता सुमारास राजधानी गेस्ट हाऊसमध्ये छापा टाकला असता घटनेतील आरोपी महादेव रमेश धनोकार वय 24 रा.पळशी बु.ता.खामगाव, मोहम्मद मुजाहीद मोहंमद नासीर वय 35 रा. दगडाळीपुरा शेगाव, संतोष नागपुरे 40 रा.शेगाव  तसेच वर्षा काल्पनिक नाव रा.घाटपुरी खामगाव हे स्व:ताचे फायद्याकरीता दोन पिडीत महिलाना देह विक्रीचा व्यवसाय करण्यास लावून मिळालेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह करण्याचे उद्देशाने वेश्यागृह चालवित असतांना मिळून आले. या ठिकाणी मिळून आलेल्या महिलांना ग्राहकांनी मागणी केल्याप्रमाणे ठिकठिकाणी पुरविण्याचे उद्देशाने सदर महिलांना वेश्या व्यवसाय करण्यात प्रवृत्त केले. तसेच आरोपी रमेश महादेव धनोकार रा.खामगाव, संतोष नागपुरे 40 रा.शेगाव हे गिर्‍हाईक म्हणून मिळून आले. सदर कारवाईत नगदी 11840 रुपये, 7 मोबाइल किंमत 19,500 व इतर 54 रुपयांची इतर साहीत्य असा एकूण 31,394 रुपयांचा माल पोलिसांनी घटनास्थळी जप्त केले आहे याप्रकरणी पोलीसांनी फिर्यादी पो नि संतोष ताले यांच्या तक्रारीवरून आरोपींविरूध्द 
अप नं 583/19 कलम 3,4,5 मुली व स्रिया अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम भादवी 1956 कलम नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास शहर ठाणेदार संतोष ताले करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prostitution business in the lodge