पार्थ पवार प्रकरणात पुणे जमीन घोटाळ्याची संपूर्ण चौकशी करून खर वास्तव समाजासमोर ठेवला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मांडली. सुप्रिया सुळे यांनी घेतलेले मत हे वैयक्तिक असू शकते, प्रशासन, राजकारण आणि कुटुंब यांचा परस्परसंबंध नसतो, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.