esakal | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण: पुणे पोलिस चौकशीसाठी यवतमाळमध्ये दाखल; सत्य समोर येणार?

बोलून बातमी शोधा

abc

पूजाचा मृत्यू नक्की कोणामुळे झाला आता याचा शोध पोलिस घेत आहेत. याचसाठी पुणे पोलिस यवतमाळ आज यवतमाळमध्ये दाखल झाले आहेत.  

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण: पुणे पोलिस चौकशीसाठी यवतमाळमध्ये दाखल; सत्य समोर येणार?
sakal_logo
By
टीम ई सकाळ

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यामुळे यात महाराष्ट्रातील मंत्र्यांचं नाव समोर आल्यामुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत. पूजाचा मृत्यू नक्की कोणामुळे झाला आता याचा शोध पोलिस घेत आहेत. याचसाठी पुणे पोलिस यवतमाळ आज यवतमाळमध्ये दाखल झाले आहेत.  

हेही वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण, ऑडिओ क्लिपमध्ये मंत्र्यांशी संवाद साधणारा तरुण गायब

पुणे पोलिस यवतमाळमध्ये का? 

पूजा चव्हाण हीच्या मृत्यू प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे पूजा चव्हाण हिनं यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतले आहेत का याची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिस  यवतमाळमध्ये दाखल झाले आहेत. 

मोठ्या नेत्याचे नाव या प्रकरणात आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. पण आणखीनही पुजाच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

या संदर्भात पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी माध्यमांजवळ मनमोकळे करताना सांगितले, की पूजा माझी मुलगी नव्हती तर तो मुलगा होता. ती अत्यंत धाडसी होती. पूजाच्या नावावर पोल्ट्रीफार्म सुरू करण्यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून हा व्यवसाय पूर्ण तोट्यात आहे. याचा ताण पुजाला येत होती.

हेही वाचा - अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरची नियमबाह्य नियुक्ती, तत्कालीन अधिकारी संशयाच्या...

तसेच पूजा सतत आजारी असायची याचाही ताण तिला येत होता. मी तिला तू ताण घेऊ नको सर्व काही व्यवस्थित होईल. पण पुण्यात जाऊन तिने बहुतेक याच कारणामुळे आत्महत्या केली आहे, असे वाटते. दुसरे कोणतेही कारण नाही. फक्त माध्यमांनी आमची बदनामी थांबवावी असे आवाहन लहू चव्हाण यांनी केले आहे. चौकशीमधून काय पुढे यायचे ते येईल. आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा समाज आमच्या पाठीशी आहे. असे यावेळी बोलताना लहू चव्हाण यांनी सांगितले. तर पुजाचे आजोबा यांनी बोलताना सांगितले की, पुजा २०-२५ दिवसांपूर्वी येवून भेटून गेली तिच्या मृत्यूची चौकशी शासकीय यंत्रणेमार्फत करावी अशी मागणी केली आहे.