

Pusad Farmer Tragedy
esakal
पुसद (जि. यवतमाळ) : पावसाअभावी कपाशीचे पीक सुकले, वाढता शेतीखर्च, कर्ज आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता अशा आर्थिक विवंचनेत असलेल्या पांढुर्णा खुर्द (रामपूर तांडा) येथील अल्पभूधारक शेतकरी नितीन बाबूराव राठोड (वय २९) यांचा गुरुवारी (ता. १) शेतात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. नितीन यांच्याकडे एक एकर शेती होती.
आई-वडील, मोठा भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. पावसाने पाठ फिरवल्याने पिकांचे नुकसान झाले. उदरनिर्वाहासाठी त्यांचा मोठा भाऊ पुण्यात कामाला गेला होता.
भावाच्या मुलीचे लग्न ठरल्याने विवाहखर्चाचीही चिंता होती. बुधवारी (ता. ३०) शेतातील सुकलेले कपाशीचे पीक पाहून नितीन अस्वस्थ झाले होते. पीक नुकसान आणि पुढील आर्थिक परिस्थितीचा विचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यांचा शेतातच मृत्यू झाला. पुसद उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. ग्राम महसूल अधिकारी गजानन कवाने यांनी प्राथमिक अहवाल तहसीलदार रेखा वाणी यांना सादर केला आहे.
दुष्काळामुळे ताण वाढला नापिकी, कर्ज आणि रोजगाराच्या प्रश्नामुळे शेतकरी कुटुंबांवरील आर्थिक ताण वाढत आहे. यापूर्वी काटखेडा येथील तरुण शेतकरी अनिल मधुकर राठोड यांचाही पीक संकटाच्या काळात हृदयविकाराने मृत्यू झाला होता. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच मानसिक आधार व समुपदेशनाची गरज व्यक्त होत आहे. नुकसानभरपाई, पीकविमा आणि रोजगाराच्या उपाययोजनांना गती देण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.